महानगरपालिका निवडणुकीचे लवकरच बिगुल वाजणार प्रभाग रचनेसाठी नगरविकास विभागाचे आयुक्तांना आदेश जारी !

0



महानगरपालिका निवडणुकीचे लवकरच बिगुल वाजणार 


प्रभाग रचनेसाठी नगरविकास विभागाचे आयुक्तांना आदेश जारी !

जनसंघर्ष न्यूज 

            धुळे :- महाराष्ट्रातील प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या चार महिन्यात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असता, निवडणूक आयोगासह राज्य सरकार सुद्धा मोठ्या प्रमाणात तयारीला लागलेले आहेत. तसेच राज्याच्या नगरविकास विभागाने धुळेसह  राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत प्रभाग रचना करण्याचे आदेश जाहीर केले आहे. सदर प्रभाग रचनेची जबाबदारी महानगरपालिका मुख्याधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आले आहे.

         राज्यातील 257 नगरपालिका व नगर परिषदांच्या प्रभाग रचनेचे आदेशही निर्गमित करण्यात आले आहेत. 25 जानेवारी 2022 च्या अधिनियमानुसार ही प्रभाग रचना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आयुक्तांनी प्रभाग रचना तयार केल्यावर राज्य निवडणू आयुक्तांकडे मान्यतेसाठी पाठवावे लागेल. निवडणूक आयोगाने मान्यत दिल्यावर प्रभागांचे प्रारूप जाहीर केले जाईल. त्यावर हरकती व सूचना मागविण्यात येतील. त्यावर सुनावणी करून प्रभागांची अंतिम रचना निवडणूक आयोगाकडे मंजुरीसाठी पाठविली जाईल. राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिल्यावर प्रभागांची अंतिम रचना जाहीर केली जाईल. ही आठ टप्प्यातील प्रक्रिया पार पडण्यासाठी किमान अडीच महिने लागू शकतात. म्हणजेच ऑगस्ट अखेरीस किवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रभागांची अंतिम रचना जाहीर होईल. त्यानंतर आरक्षणाची सोडत काढली जाईल. निवडणुका ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता वर्तविली जाते.

           गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या भावी नगरसेवकांना महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार असल्याची माहिती मिळताच राजकीय हालचालीं सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)