भिम बुद्ध सिल्वर सेवाभावी संस्था तर्फे ज्येष्ठ पौर्णिमा निमित्त खीर वाटप
जनसंघर्ष न्यूज
धुळे दि.११ :- शहरात सालाबादप्रमाणे भिम बुद्ध सिल्वर सेवाभावी संस्था तर्फे महामाया शुद्धोधन कॉलनी जलगंगा सोसायटी येथे ज्येष्ठ पौर्णिमा कबीर जयंती (वटपौर्णिमा) चे अवचित्य साधून तथागत भगवान गौतम बुद्ध भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाना पुष्प अर्पण करून दीप प्रज्वलन ज्योत्सनाताई नितीन थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर सामूहिक बुद्ध वंदना घेऊन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते खिर वाटप करण्यात आली.
या वेळी उपस्थित मान्यवर भीम बुद्ध सिल्वर सेवाभावी संस्था अध्यक्षा रेखा राजेंद्र पवार,दाता सरकार ग्रुप संचालक बबन बापू थोरात, बिस्मिल्ला गादी संचालक कलीम तेली, कैलाश महाजन,सलीम शेख,आसिफ शेख,भटू चौधरी, राजेश्री पवार,आम्रपाली पवार,अर्जुन राजेश्री राजेंद्र पवार बॉबी आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजुबाबा पवार यांनी केले.

