वाढदिवसाच्या औचित्य साधून एक " पेड मॉं के नाम " उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना 40 आंब्याच्या झाडांचे वाटप
नेहा ज्वेलर्स चे संचालक मनोज वर्मा यांच्या मुलीचा वाढदिवस समाजाला आदर्श देणारा
जनसंघर्ष न्यूज
नेर :- धुळ्यात तालुक्यातील नेर गावातील प्रसिद्ध उद्योजक स्नेहा ज्वेलर्सचे संचालक श्री.मनोज वर्मा व सौ. नितू वर्मा यांच्या कन्या खुशी वर्मा च्या वाढदिवसानिमित्त एक अनोखा उपक्रम राबवून कौतुकास्पद कामगिरी करत केली आहे.
स्नेहा ज्वेलर्सचे संचालक श्री मनोज वर्मा व सौ नितू वर्मा यांनी आपल्या लाडक्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरणाचा समतोल व हरित भविष्य राखण्यासाठी शासनाच्या एक पेड मॉं के नाम या उपक्रमांतर्गत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गावातील शेतकऱ्यांना सात ते आठ फुटांचे चाळीस आंब्याच्या झाडांची रोपे वाटप करून वाढदिवस साजरा करत गावाला एक आदर्श दिला आहे.
खुशी वर्मा यांनी बोलताना सांगितले की प्रत्येकाने वाढदिवस असेच साजरे करून दरवर्षी एक तरी झाड लावावे व संगोपन करावे. जेणेकरून आपण पर्यावरणाचे रक्षण करून आपल्या देशातील होणारे प्रदूषण रोखू शकतो व प्रदूषणामुळे होणारे दुष्परिणाम रोखू शकतो. यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे.

