न्हावरे ॲट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करा अन्यथा तीव्र आंदोलन करणार
आरपीआय पुणे जिल्हाध्यक्ष सचिन खरात प्रशासनाला इशारा
जनसंघर्ष न्यूज
पुणे :- 9 जुलै 2025 रोजी न्हावरे शिरूर येथील सुहास कदम या युवकाची जागा बळकवून जातिवाचक शिवीगाळ केले प्रकरणी बाळासाहेब जांबळकर उषा जांभळकर ओकार जांभळकर यांच्यावर अनुसूचित जाती जमाती कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पण आज 14 दिवस उलटून गेले तरीही या लँडमाफिया जातीयवादी आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही आणि त्याच पार्श्वभूमीवर या बाळासाहेब जांभळकर यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी याने ज्या ज्या लोकांवर अन्याय केलेला आहे, ज्या लोकांच्या जमिनी बळकवलेले आहेत ते सर्व लोक शिरूर डीवायएसपी प्रशांत ढोले यांच्याकडे तक्रार देण्यास पुढे आलेले आहेत.
तरी देखील सुहास कदम यांना या आरोपींनी जातीय द्वेष भावनेतून त्याची जमीन बळकवून त्याला जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण केली होती तरी त्या आरोपींना अटक करावे व सुहास कदम व संबंधित पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, दलित समाजावर अत्याचार पाहता या जातीवादीना आळा बसवणे अत्यंत गरजेचे आहे, पण शोकांतिका अशी आहे की या जातीवाद्यांना जरब बसवण्यामध्ये पोलीस यंत्रणा धीम्या गतीने कार्य करत असलेचे निदर्शनास येत आहे, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) च्या वतीने पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण ऑफिस येथे कायद्याच्या सनदशीर मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चे पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन भाऊ खरात यांनी दिलेला आहे
यावेळी आरपीआय चे जिल्हा संघटक दिनेश कदम, विद्यार्थी अध्यक्ष आनंद ओव्हाळ, तुषार निमगिरे, संतोष शिंदे, प्रतीक आढाव, राजू गायकवाड, व आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

