धुळे जिल्हा शिक्षक समन्वय संघाचे 8-9 जुलै रोजी शाळा बंद आंदोलन

0


धुळे जिल्हा शिक्षक समन्वय संघामार्फत दि. 08 व 09 जुलै 2025 रोजी राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक सर्व शाळा बंद आंदोलन...

जनसंघर्ष न्यूज 

     धुळे:- दि.05 जुन 2025 पासुन शिक्षण संमन्वय संघावतीने आझाद मैदान, मुंबई येथे अंशतः अनुदानित शाळांचे आंदोलन सुरु आहे. दि. 14 ऑक्टो. 2024 च्या शासननिर्णयाद्वारे शासनाने राज्यातील अंशतः अनुदानित शाळांना 01 जून 2024 पासून वाढीव टप्पा अनुदान देण्याचे जाहीर केले होते. मात्र त्यानंतर झालेल्या मागील हिवाळी अधिवेशनात याबाबत तरतूद करण्यात आली नाही. त्यानंतर झालेल्या मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात पावसाळी अधिवेशनामध्ये या शाळांच्या निधीसाठी आर्थिक तरतुद करण्यात येईल असा शब्द शासनाकडून देण्यात आला होता. मात्र आता दि. 30 जून 2025 पासून सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये या शाळांच्या निधीसाठी आर्थिक तरतुद करण्यात आलेली नाही.

शासनाने वेळावेळी आश्वासन देवूनही निधी देण्यास टाळाटाळ करित असल्याने अंशतः अनुदानित शिक्षक-शिक्षकेतरांमध्ये फसवणुक झाल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यभरात अंशतः अनुदानित शिक्षक-शिक्षकेतर बाधवांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. याचा निषेध म्हणुन दि. 08 व 09 जुले 2025 रोजी राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवून निषेध नोंदविला जाणार आहे. या कालावधीत धुळे जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक अंशतः अनुदानित शिक्षक शिक्षकेतर या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. याबाबत धुळे जिल्हा शिक्षक समन्वय संघामार्फत धुळे जिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना निवेदन देण्यात आले व आमच्या भावना शासनापर्यंत पोहचवाव्यात, अशी मागणी करण्यात आली.

निवेदन देताना जयपाल देशमुख,योगेंद्र पाटील,श्रद्धाेश कुलकर्णी,चेतन भामरे,विजय देसले,पवन पाटील,सी.डी. राजपूत,जयेश गाळणकर,अन्सारी मोहम्मद,महेंद्र बच्छाव,शेखर बागुल,के.पी.पवार,प्रमोद राजपूत एल.व्ही.माळी,अशपाक खाटीक,सतिश पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)