मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांची भ्रष्टाचारात पीएचडी ;
शिवसेना उबाठा ची जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी
टक्केवारीसाठी मनपा आयुक्त यांच्या कार्यादेशाच्या बाराव्या दिवशीच दवाखान्याचे काम पूर्णत्वाच्या टप्प्यात
जनसंघर्ष न्यूज
धुळे :- महानगरपालिकेत धुळे महानगरपालिकेच्या आयुक्त सौ .अमिता दगडे पाटील यांनी प्रशासक म्हणून भ्रष्टाचाराचा कळस गाठला असून त्यांच्यावरती प्रशासनाचा कुठलाही धाक राहिलेला नाही, त्यामुळे अत्यंत बेजबाबदारपणे स्थायी समितीमध्ये ठराव पारित करणे ,त्या ठरावांच्या अंमलबजावणीचे कार्यादेश देण्याच्या अगोदर संबंधित काम पूर्णत्वास येणे व ठेकेदारांकडून अव्वाच्या सव्वा टक्केवारी घेणे ही कामे सर्रास सुरू आहेत.
धुळे मनपा येथील प्रभाग क्रमांक सात मध्ये मोगलाई टीव्ही सेंटर जवळ दवाखाना बांधण्याचा कार्य देश मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांच्या स्वाक्षऱ्याने 30 मे 2025 रोजी काढण्यात आला, सदर काम मनपाच्या 2025=26 निधी अंतर्गत करण्यात येणार आहे कामाचा कार्यादेश देण्यास पूर्वी उक्त काम पूर्णत्वास आल्याने मनपा आयुक्त दगडे पाटील यांच्या कार्यशैलीवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्रशासक तथा आयुक्त यांनी दिनांक 30 मे 2025 ते दोन ते तीन दिवस अगोदर किंवा पुढे अशा काळात देण्यात आलेल्या कार्यादेशाच्या कामाबाबत देखील त्यांची कार्य तत्परता कोणी तपासावी असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे ? सदरचा प्रकार अत्यंत गंभीर असून जिल्हाधिकारी या नात्याने आपणच आता त्यांच्या कार्यशैलीची चौकशी करायला हवी. कारण आयुक्त यांच्या कार्यकाळात धुळे शहरात मनपा हद्दीत आयुक्तांच्या कार्यादेशा पूर्वी किती कामे सुरू झाली आहेत ,आणि त्यांची आज अखेर काय स्थिती काय आहे? याची चौकशी करणे गरजेचे आहे तसेच या कामातील दर्जाबाबत आणि कार्य शैली बाबत निश्चितच मोठ्या प्रमाणात या दोष निर्माण झालेले असून त्याबाबत धुळेकरांनी महानगरपालिकेच्या प्रशासनाकडे देखील गंभीर तक्रारी दाखल केलेले आहेत. धुळे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागात प्रचंड सावळा गोंधळ सुरू असून केवळ टक्केवारी घेऊन वाढीव ईस्टिमेट च्या आधाराने कोट्यावधी रुपयांची बिले टक्केवारी घेऊन काढली जात आहेत या कामांची गुणवत्ता देखील तपासली जात नसून, आयुक्तांच्या कार्यादेशाच्या अगोदरच धुळे महानगरपालिकेच्या हद्दीतील मोगलाई येथील दवाखान्याचे बांधकाम पूर्ण कसे होते, हे बांधकाम पूर्ण करणारा ठेकेदार कोण? त्याच ठेकेदाराला कार्यादेश निघाल्यानंतर ते काम कसे मिळाले? यासंबंधी बांधकाम विभागाच्या अभियंता यांची जबाबदारी काय? या सर्व गोष्टींची शहनिशा होणे गरजेचे आहे. कार्यादेश निघण्यापूर्वी तब्बल एक कोटी ३४ लाखांच्या निधी तुन रुग्णालयाच्या दुमजली इमारतीची उभारणी केली जात असून 30 मे 2025 रोजी संबंधित ठेकेदाराला कार्यादेश देण्यात आला असून केवळ 12 दिवसातच तळमजला या ठेकेदाराने उभा करून दाखवला आहे. यामुळे या रुग्णालयाच्या बांधकामाचा दर्जा संदर्भात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत या ठिकाणी गेल्या सहा महिन्यापासून रुग्णालयाच्या इमारतीचे काम सुरू असल्याची माहिती नागरिकांनी दिली असून कार्यादेश निघण्यापूर्वी ठेकेदाराने काम कसे पूर्ण केले या संपूर्ण प्रकाराची चौकशी करणे गरजेचे आहे.
धुळे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाच्या वतीने धुळे शहरात राज्य शासनाच्या विविध निधी अंतर्गत अत्यंत सुमार व बोगस दर्जाची कामे झाल्याचे उघड झाले असून केवळ स्थानिक अधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळेस कारवाई न केल्यामुळे या कामांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे जनतेच्या पैशाची सर्रासपणे लूट सुरू असून कोट्यावधींचा निधी त्यासाठी वापरला जात आहे मात्र या निधीतून दर्जेदार व गुणवत्तापूर्वक कामे होतात की नाही याची जबाबदारी मात्र कोणीच घ्यायला तयार नाही 12 दिवसात रुग्णालयाचा तळमजला उभारला गेला असून इतक्या कमी कालावधी तळमळला उभारला कसा काय उभारण्यात आला ?याबाबत अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. महानगरपालिका भ्रष्टाचार करीत नाही असा दावा काही अधिकाऱ्यांकडून केला जातो मात्र साक्री रोडवरील टीव्ही सेंटरच्या इमारतीच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. संबंधित बांधकामाचा ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या संगणमतीनेच महानगरपालिका आयुक्त यांनीच हा भ्रष्टाचार आता घडवून आणलेला असून, धुळे महानगरपालिका आयुक्तांनी आपल्या प्रशासकीय काळात किती कामांना कार्यादेश देण्यापूर्वीच ठेकेदारांनी कामे पूर्ण केली याची चौकशी करणे गरजेचे आहे.
आमच्या निवेदनाचा गांभीर्याने विचार करून आपण राज्य शासनाच्या नगर विकास खात्यापर्यंत संबंधित महानगरपालिका आयुक्त यांची भ्रष्टाचाराबाबतची तक्रार आमच्या निवेदनाचा संदर्भ देऊन सादर करावी व या धुळे जिल्ह्याच्या प्रथम नागरिक या नात्याने धुळे महानगरपालिकेच्या कारभारात लक्ष घालून महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून होणाऱ्या भ्रष्टाचारी बोगस कामांच्या बाबतीत कार्यवाही करावी. अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.
यावेळी शिवसेना उबाठा वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, भगवान करणकाळ,उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी, महानगर प्रमुख धीरज पाटील, भरत मोरे, प्रशांत भदाने ,विजय वाघ,सुनील पाटील, संदीप सूर्यवंशी, महिला आघाडीचा संगिता जोशी, जयश्री वानखेडे, अरुणा मोरे, ज्योती चौधरी, राजु ढवळे, जवाहर पाटील, शेखर वाघ, शिवाजी शिरसाळे,, अण्णा फुलपगारे , सुभाष मराठे, मुन्ना पठाण, कपील लिंगायत, महादु गवळी,आनंद जावडेकर,डॉ.अनिल पाटील, डॉ. सोमनाथ चौधरी, गजेंद्र पाटील , पंकज भारस्कर, दिनेश पाटील, संदीप चौधरी, रामदास कानकाटे,आबा भडागे, विकास शि़गाडे,संजू मामा पाटील, हिमांशू परदेशी, मनोज शिंदे,सुनील चौधरी,पीनु सुर्यवंशी, अजय चौधरी, पिंटू ठाकूर, सलीम शेख, शुभम मतकर , विष्णू जावडेकर,,सागर निकम, आबा हरळ, रोहित धाकड, सुरज भावसार, सागर साळवे, बंटी अहिरे, भैय्या बच्छाव, योगेश पाटील , निलेश कांजरेकर,अनिल शिरसाट ,अमोल ठाकूर , अनिल चौधरी, इस्तियाक आंसरी, युवराज मराठे, नितीन जडे,केतन भामरे, वैभव पाटील, गुलाब धोबी, प्रदीप भोला भाऊ पाटील तेजस सपकाळ , प्रवीण राणा आदी उपस्थित होते.

