ABVP च्या स्थापना दिनानिमित्त व प्रा. यशवंतराव केळकर जन्मशताब्दी वर्षानिमित्त‘यशवंत गुणगौरव सोहळा’उत्साहात संपन्न
जनसंघर्ष न्यूज
धुळे :– ९ जुलै २०२५ रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, धुळे शाखेच्या वतीने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या स्थापना दिनानिमित्त व प्रा. यशवंतराव केळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त‘यशवंत गुणगौरव सोहळा’महाराणा प्रताप विद्यालय, धुळे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे उद्घाटक फाऊंडेशन क्लासेस चे संचालक CA शाम अग्रवाल, अभाविप देवगिरी प्रदेश सहमंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे, कार्यक्रम प्रमुख कु. मयुरी जाधव या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रतिमापूजन करून करण्यात आले.
यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे 77 वर्षातील कार्य व प्रा. यशवंतराव केळकर यांचे जीवनकार्य विद्यार्थ्यांसमोर उलगडून सांगण्यात आले. प्रा. यशवंतराव केळकर हे एक प्रखर विचारवंत, शिक्षक आणि विद्यार्थी संघटनांचे शिल्पकार होते. त्यांचा जन्म २५ एप्रिल १९२० रोजी पंढरपूर येथे झाला. मुंबई विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांनी प्रेरित होऊन विद्यार्थी संघटनांमध्ये सक्रिय भूमिका बजावली.ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (ABVP) एक महत्त्वाचे आधारस्तंभ होते. त्यांच्या विचारांमधून ‘जागरूक, बांधिलकीची जाणीव असलेला आणि सामाजिक उत्तरदायित्व स्वीकारणारा विद्यार्थी’घडवण्यावर त्यांनी भर दिला. ABVP मध्ये त्यांच्या योगदानाची दखल घेत दरवर्षी‘प्रा. यशवंतराव केळकर युवा पुरस्कार’दिला जातो.
कार्यक्रमात CA शाम अग्रवाल यांनी करिअर मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच सामाजिक जाणीव ठेवत पुढे जाण्याचे आवाहन केले. 10 वी व 12 वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, राष्ट्रनिष्ठा आणि प्रेरणा जागृत होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
‘यशवंत- गुणगौरव सोहळा’ फक्त एक कार्यक्रम नव्हता, तर तो होता विद्यार्थ्यांमध्ये देशकार्याची ठिणगी चेतवणारा एक अध्याय. अशा उपक्रमांमधून समाजात सजग, जबाबदार आणि राष्ट्रनिष्ठ नेतृत्व निर्माण होईल, हीच अपेक्षा व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना नवसंघटन, आत्मविश्वास आणि सामाजिक बांधिलकी यांचा बाळकटीतून अनुभव देणारा हा सोहळा ठरला. उपस्थित मान्यवरांनी आणि पालकांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कल्पना काकडे यांनी केले तर आभार मयुरी जाधव यांनी मांडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हर्षल शिरसाठ, ओम फुलपगारे, जय औरंगे, सुवर्णा जाधव, मनिष कुलकर्णी या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.

