विश्व मानव रुहानी केंद्र धुळे येथे गुरुपौर्णिमा निमित्ताने रक्तदान शिबीर व सत्संग प्रवचनाचा कार्यक्रम दिमाखात साजरा
जनसंघर्ष न्यूज
धुळे- प्रतिनिधी :- गुरुपौर्णिमा निमित्ताने परमसंत बलजीत सिंग महाराज यांच्या आशिर्वादाने विश्व मानव रुहानी केंद्र बिलाडी रोड धुळे येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा साजरा करण्यात येत असते , धुळे जिल्ह्यातील भाविक या ठिकाणी मोठया प्रमाणावर सहभागी होत असतात
यावेळेस ही गुरुपौर्णिमा निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यात 60 ते 70 रक्तदात्यांनी रक्त दान केलं तत्पूर्वी विश्व मानव रुहानी केंद्रात सकाळी ध्यान भजन , प्रोजेक्टर द्वारे सत्संग आणि लंगर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता ..
यावेळी केंद्रातील कमिटीचे उमेश चौधरी यांनी पत्रकारांशी संवादात म्हणाले की विश्व रुहानी मानव केंद्र हे परमसंत बलजीत सिंह जी महाराज यांच्या आदेशानुसार एक परोपकारी संस्था आहे , ज्यातून अनेक लोकहीत कामे होत असतात , या संस्थेच्या सुमारे पूर्ण भारतात 255 शाखांपेंक्षा जास्त शाखा आहे
यातून विविध राज्यात विविध शहरात मेडिकल कॅम्प, रक्तदान शिबिर , मूलभूत सुविधांचे वाटप करणे , अमरनाथ यात्रेत भाविकांसाठी दरवर्षी मेडिकल कॅम्प लावला जात असतो ज्याचा लाभ हजारो भाविक घेत असतात व यापुढेही असेच धार्मिक व जनहित कार्यक्रम परमसंत बलजीत सिंह जी महाराज यांच्या आशिर्वादाने सुरूच राहतील असे मत त्यांनी व्यक्त केले
विश्व मानव रुहानी केंद्रात या गुरुपौर्णिमेला बहुसंख्य भाविक आजूबाजूच्या खेड्यापाड्यांवरून आलेले होते ,त्यात केंद्रातील सेवेदर व सदस्य यांच्या शिस्तबद्ध नियोजनाने सर्वांना सत्संगाचा व महाप्रसादाचा लाभ सर्वां भाविकांना याचा लाभ घेता आला

