चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन हद्यीतील अट्टल मोटार सायकल चोर जेरबंद

0

 

चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन हद्यीतील अट्टल मोटार सायकल चोर जेरबंद 

आरोपीकडून 4 लाख 70 हजार किमतीच्या दहा मोटरसायकल हस्तगत

जनसंघर्ष न्यूज 

      धुळे :- शहरातील चाळीसगाव रोड पोलीस ठाणे येथे दिनांक १६/०४/२०२५ रोजी फिर्यादी नामे मुहम्मद कैसर मुहम्मद इल्यास अन्सारी, रा. गफुर नगर, चाळीसगाव रोड धुळे यांनी फिर्याद दिली होती की दिनांक ०५/०३/२०२५ रोजी सकाळी ११.०० वा. ते सायंकाळी ०५.०० वाजेचे दरम्यान फिर्यादी हे धुळे शहरातील चाळीसगाव रोड वरील सोना कब्रस्तान बाहेर रोडावर लावलेली फिर्यादीची मोटार सायकल हिरो कंपनीची एचएफ डीलक्स क्रमांक एम एच १८ ए यु ९५८६ ही कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादींच्या संमती शिवाय लबाडीच्या इरादयाने चोरुन नेली आहे , बाबत चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन सी सी टी एन एस गुरनं ८५/२०२५ बी.एन.एस. कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

       सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री पोनि सुरेश कुमार घुसर यांनी शोध पथकास वरील गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेशित केले. सदर गुन्हयातील चोरीस गेलेल्या मोटार सायकल व अज्ञात आरोपी इसमाचा शोध घेत असतांना गोपनीय बातमीदाराकडुन वर नमुद गुन्हयातील आरोपी हा १०० फुटी रोडवर फिरत असल्याचे माहिती मिळाल्याने त्यास त्याचे नाव गांव विचारता त्याने त्याचे नाव शेख सलीम असे सांगितले. त्यास चौकशीकामी पोलीस स्टेशनला आणुन त्यास विचारपुस केली असता त्याने वर नमूद गुन्हयातील एच एफ डीलक्स मोटार सायकल चोरी केली आहे बाबत सांगितल्याने त्यास नमुद गुन्हयात अटक करण्यात आलो आहे. सदर आरोपी पोलीस रखवालीत असतांना त्यास विश्वासात घेवुन अधिक विचारपुस केली असता त्याने चाळीसगांव रोड पोलीस स्टेशन गु.र.नं. १४३/२०२५ व गु.र.नं. १४८/२०२५ या गुन्हयातील मोटार सायकली त्याचे साथीदारासह मिळुन चोरी केली आहे बाबत कबुली दिलेली आहे. 

      यावेळी आरोपींजवळून जप्त केलेल्या मोटार सायकल 1) हिरो एच एफ डिलक्स क्रमांक एम एच 18 ए यू 9586 , 2)  हिरो एच एफ डिलक्स क्रमांक एम एच 18 बी जे 5198 , 3) हिरो एच एफ डिलक्स क्रमांक एम एच 18 बो पो 6916 , 4) युनिकॉन चेसिस नंबर ME4KC315FKA064776 ,5)  हिरो एच एफ डिलक्स चेसिस नंबर MBLHA11EK99J03031 , 6)  हिरो सी.डी डिलक्स चेसिस नंबर MBLHAR232H9D29319 , 7)  हिरो स्पेलन्डर इंजिन नंबर HA10AGHHCD3047 , 8) हिरो एच एफ डिलक्स इंजिन नंबर HA11ENJ9F03833, 9) हिरो स्पेलन्डर इंजिन नंबर 06J15M08985 , 10) होंडा कंपनीची शाईन इंजिन नंबर JC65E72246328 असे एकुण 4,70,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

           नमुद गुन्हयातील अटक आरोपीताच्या साथीदारास अटक करणे बाकी असून त्यास अटक केल्यानंतर आणखी गुन्हे उघडकीस येतील असे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले

          सदर ची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री श्रीकांत धिवरे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री उपासे, धुळे शहर विभाग धुळे यांचे सुचना व मार्गदर्शना खाली पोनि/श्री. सुरेशकुमार घुसर, पोउनि/श्री. हरीश्चंद्र पाटील, पोहेकों/अविनाश वाघ, निलेश देवरे, पोकॉ शोएब बेग, अतिक शेख, सचिन पाटील, निलेश चव्हाण, विनोद पाठक, संदीप वाघ, धिरज सांगळे, राकेश मोरे, अभिलेश बोरसे अशांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)