आरटीओ विभागातील अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा ; धुळे न्यायालयाचे आदेश

0


आरटीओ विभागातील अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा ; धुळे न्यायालयाचे आदेश 

प्रादेशिक परिवहन अधिकारी परवेज तडवी , मोटार वाहन निरीक्षक सुनील ठाकूर सह पोलीस निरीक्षक संजय सानप अडचणीत

जनसंघर्ष न्यूज 

         धुळे :-  प्रादेशिक परिवहन कार्यालयातील तत्कालीन वरिष्ठ अधिकारी परवेज तडवी यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये विविध बेकायदेशीर तसेच भ्रष्टाचारी वृत्तीने काम करत मोटार वाहन निरीक्षकांकडून त्यांची ड्युटी लावून देण्याच्या बदल्यात मोठ्या प्रमाणावर पैशांची मागणी करणे, तसेच वाहन चालकांकडून त्यांना कायद्याचा धाक दाखवून त्यांच्याकडून पैशांची मागणी करणे, तसेच ठेकेदारांकडून त्यांची पैसे त्यांची बिले अदा करण्याच्या बदल्यात टक्केवारीची मागणी करणे असले इत्यादी स्वरुपातील बेकायदेशीर व भ्रष्ट कारभार आर.टी.ओ. परवेज तडवी यांनी चालवला होता.

        तसेच त्यांच्या यावरील संपूर्ण बेकायदेशीर कृत्यांविषयी एडवोकेट जहीरोद्दिन शेख यांना माहिती प्राप्त झाली होती तेव्हा ते थोरसमाजसेवक अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास या संघटनेचे काम पाहत असल्यामुळे त्यांनी धुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील तत्कालीन प्रादेशिक परिवहन अधिकारी परवेज तडवी यांच्या संपूर्ण भ्रष्टाचारी व बेकायदेशीर कृत्याविरोधात त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पुराव्यांसह लेखी स्वरुपात तक्रारी दाखल केल्या होत्या, परंतु संबंधित वरिष्ठ अधिकारींनी दाखल केलेल्या तक्रारींची कोणतीही योग्य प्रकारे दखल घेतली नव्हती.

       त्याच दरम्यान दिनांक ३०/०३/२०१९ रोजी परवेज तडवी व मोटार वाहन निरीक्षक सुनील प्रकाश ठाकूर याने वाहनचालक आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय धुळे येथील लिपीक च्या सहाय्याने कट रचून देवपूर पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक श्री. संजय सानप यांनाही हाताशी घेत जहीरोद्दिन शेख यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केलेत आणि त्याच दरम्यान हे सर्व आरोप होत असतांना शेख यांनी या प्रकरणातील संपूर्ण घटनाक्रम व वस्तुस्थिती सविस्तरपणे त्याचबरोबर कागदोपत्री पुराव्यांसही लेखी तक्रारी स्वरुपात नमुद करुन तत्कालीन पोलीस निरिक्षक श्री. संजय सानप यांचेकडे सादर केली परंतु दुदैवाने पोलीस निरीक्षक श्री. संजय सानप यांनी शेख यांच्या तक्रारीची कोणत्याही स्वरुपात दखल न घेत उलट उघडपणे भ्रष्ट व बेकायदेशीर कृत्यांमध्ये सामील असलेले धुळे आरटीओ परवेज तडवी व मोटार वाहन निरीक्षक सुनील ठाकूर, धुळे आरटीओ कार्यालयातील लिपिक रवी बैसाणे व वाहनचालकाकडून करण्यात येत असलेल्या खोट्या आरोपांची दखल घेऊन जहीरोद्दिन शेख यांच्या विरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

       त्यानंतर सलग दोन ते तीन दिवस पत्रकार बांधवांना खोटी माहिती पुरवून त्यांची दिशाभूल करत जवळपास सर्वच वृत्तपत्रांमधून शेख यांची मोठ्या प्रमाणावर बदनामी केली होती.

       त्यानंतर जहिरोद्दीन शेख यांनी 'रुल ऑफ लॉ' या कायद्यांतील सर्वोच्च स्थानावर असलेल्या तत्त्वावर विश्वास ठेवून झालेल्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी तसेच भ्रष्ट व बेकायदेशीर कृत्ये करणारे धुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे तत्कालीन प्रादेशिक परिवहन अधिकारी परवेज तडवी धुळे मोटार वाहन निरीक्षक सुनील प्रकाश ठाकूर व देवपूर पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्यासह धुळे आरटीओ कार्यालयातील लिपीक रवी बैसाने व वाहनचालक या सर्व गुन्हेगारांवर गुन्हा दाखल होऊन आणि कायद्यानुसार शिक्षा मिळावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १५४(३) अन्वये पोलीस अधीक्षक साहेब धुळे यांच्याकडे तक्रार दाखल केली होती तसेच योग्य पाठपुरावाही केला परंतु दुर्दैवाने धुळे पोलीस अधीक्षक साहेब यांच्या कार्यालयाकडूनही शेख यांच्या तक्रारीवर कोणतीही स्वरुपाची दखल घेण्यात आली नाही परिणामी शेख यांना याबाबत धुळे न्यायालयात मुख्य न्यायादंडाधिकारी साहेब यांच्या न्यायालयात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १५६(३) अन्वये दाद मागिवी लागली त्याप्रमाणे मुख्य न्यायदंडाधिकारी साहेब, धुळे यांच्या अंतर्गत विविध न्यायालयात या प्रकरणी कामकाज चालले तसेच शेख यांनी स्वतः संबंधित न्यायालयासमोर सर्व हकीकत उपलब्ध पुराव्यांसह तसेच कायदा व विविध  उच्च व सर्वोच्च न्यायालयांचे लँडमार्क जजमेंटच्या सहाय्याने युक्तीवाद केला असता, त्यावर मुख्य न्यायादंडाधिकारी साहेब, धुळे यांच्या न्यायालयाने दखल घेऊन धुळे प्रादेशिक परिवहन अधिकारी परवेज तडवी व धुळे मोटार वाहन निरीक्षक श्री. सुनील प्रकाश ठाकूर व देवपूर पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक श्री. संजय सानप यांच्यासह प्रादेशिक परिवहन कार्यालय धुळे येथील लिपिक व ड्रायव्हर यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेत. या आदेशात भारतीय दंड संहिता १८६० चे कलम ३४७ बेकायदशेरपणे ताब्यात ठेवणे किंवा बेकायदेशीर कृत्य करण्यास भाग पाडण्यासाठी ताब्यात ठेवणे, कलम ३५५ अपमान करण्याच्या उद्देशाने हल्ला किंवा गुन्हेगारी बळजबरी, कलमत ३८९ गुन्ह्याची खोटी तक्रार करण्याची भिती दाखवून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणे, कलम ४०९ सरकारी कर्मचारी किंवा बँकर, व्यापारी किंवा एजंट यांनी केलेला फौजदारी विश्वासघात, कलम १०९, गुन्हा करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीला प्रवृत्त करणे, कलम २०९ फसवणूक करुन किंवा अप्रामाणिकपणे न्यायालयात खोटा दावा दाखल करणे, कलम २११ दुखापत करण्याच्या उद्देशाने खोटा गुन्हा दाखल करणे, कलम ३४ समान हेतू पुढे नेण्यासाठी अनेक व्यक्तींनी केलेली कृत्यु आदी कलमांचा समावेश करुन दखलपात्र गुन्हा नोंदविण्याचा आदेश देण्यात आला आहे व त्याप्रमाणे वरील सर्व आरोपींना समन्स बजावून न्यायालयात हजर राहण्याचेही सांगण्यात आले आहे. त्याप्रमाणे आता या प्रकरणी पुढील कामकाज धुळे न्यायालय येथे चालणार आहे असे ऍड.जहिरोद्दिन शेख यांनी साक्री रोड येथील धुळे जिल्हा पत्रकार संघाच्या पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)