कापडणे गावाला शुद्ध पाणी मिळावे म्हणून ग्रामस्थांचे थाळी नाद आंदोलन
ग्रामपंचायत व जिल्हा प्रशासन जागे व्हा कापडणे कर जनतेचे समस्या सोडवा
कापडणे प्रतिनिधी :- आज दिनांक 29 रोजी कापडणे गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कापडणे कर गावकऱ्यांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी सर्व कापडणे कर जनतेने थाळी नाद आंदोलन केले.
गेल्या पंधरा दिवसांपूर्वी कापडणे गावात शुद्ध पाणी संदर्भात सामाजिक कार्यकर्ते भूषण ब्राम्हणे यांनी तक्रारी अर्ज केला होता. नंतर त्याचे पडसाद म्हणून गावातील लोकांनी जल कुंभा वरती चढून शोले स्टाईल पाण्या साठी आंदोलन केले. ग्रामपंचायतीच्या सांगण्यावरून दोन ग्रामसभा देखील झाल्या पण शुद्ध पिण्याच्या पाण्याबाबत योग्य असा निर्णय किंवा खुलासा आंदोलकांना व ग्रामस्थांना ग्रामपंचायतीमार्फत मिळाला नाही. म्हणून त्यांना परत गावातील पाणी प्रश्नाच्या तीव्रतेची जाणीव करून देण्यासाठी आज कापडणे कर जनतेने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा जवळ जोरदार थाळीनाद आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनाप्रसंगी भूषण ब्राह्मणे ,आत्माराम पाटील, बालू नाना पाटील, जितेंद्र पाटील, भटू आबा पाटील, ललित बोरसे आदी ग्रामस्थांनी आपली मतं व्यक्त केली. त्यात त्यांनी सांगितले की, गावाला शुद्ध पाणी पाजण्याची जबाबदारी ग्रामपंचायतची आहे. पण सामान्य जनता आंदोलन करीत असून देखील ग्रामपंचायत काहीच बोलायला तयार नाही. किंवा कुठला खुलासा देण्यास तयार नाही. सोबत 17 लाखाचा आरो फिल्टर प्लॅन पंधरा दिवसात कार्यरत करणार होते त्याचे देखील कुठल्याही प्रकारचा स्पष्टीकरण ग्रामपंचायत द्यायला तयार नाही. तो फिल्टर प्लॅन आता सुरू होणार किंवा नाही याच्यात मोठा समभ्रम निर्माण झाला आहे. कारण त्या साहित्याची अवस्था पाहिली तर अत्यंत खराब आहे व काही साहित्य गहाळ देखील झालेले आहे. सदर आंदोलकांमध्ये ललित बोरसे यांनी सदर आंदोलनाचा काय फायदा झाला याविषयी बोलताना सांगितले की ज्यावेळेस पहिली ग्रामसभा झाली त्यात जलजीवन मिशनचे पवार साहेब यांनी उत्तर देताना असे सांगितले की, देवभाणे धरणातील पाणी तेथील ग्रामपंचायत घेऊ देत नाही. म्हणून आम्ही सोनगीर येथून पाणी आणण्यासाठीचा प्रस्ताव तयार करीत आहोत. पण जर तुम्ही देवभाने धरणावरून पाणी गावासाठी आणले तर एका कुटुंबास 900 रुपये पाणीपट्टीचा खर्च होऊ शकतो पण तेच पाणी सोनगीर हून आणले तर तो खर्च 3500 इतका होईल. म्हणून त्या ग्रामसभेत आंदोलकांनी सांगितले की आम्हाला एवढा पैसा खर्च करणे शक्य होणार नाही. आपण गावाला देवभाने धरणातून पाणी पाजावे. म्हणजे सदर आंदोलनातून एका कुटुंबाचे किमान 2600 रुपये वाचवण्यात आपण यशस्वी ठरलो आहोत. व आंदोलकांच्या माध्यमातून असे देखील सांगण्यात आले की येणाऱ्या काळात जर पाणी मिळाले नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. शुद्ध पाणी मिळाल्याशिवाय गावातील आंदोलन थांबणार नाही असे यावेळेस ग्रामस्थांनी सांगितले. सदर आंदोलना प्रसंगी नवल अण्णा पाटील, अरुण दादा पाटील, उज्वल बोरसे, मिलिंद सरदार, भटू वाणी, राजू माळी, प्रेम राज गोसावी, रमेश माळी, छोटू माळी, दत्तात्रय माळी, भाऊसाहेब माळी, प्रणव बच्छाव, ज्ञानेश्वर पाटील, अमोल पाटील, भूषण सैंदाणे, सुनील पवार, मनोहर पाटील, दीपक भामरे, सचिन मोरे, विनोद भामरे, दुर्गेश पाटील, अशोक पाटील, पत्रकार जिजाबराव माळी, जगन्नाथ पाटील, विठोबा माळी, विशाल शिंदे, भाऊसाहेब माळी, प्रकाश माळी व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

