मोहाडी उपनगर महालक्ष्मी क्लिनिक मधील अनधिकृत गर्भपात सेंटरवर आरोग्य विभागाच्या छापा
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या तक्रारीवरून झोपेचे सोंग घेतलेली आरोग्य यंत्रणा खडबडून जागी
डॉ. भानुदास पाटील (शिंदे) यांच्यावर मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
गर्भपात करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अवैध्य औषधी केल्या जप्त
जनसंघर्ष न्यूज
धुळे :- विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी धुळे शहरातील मोहाडी उपनगर येथे एका खासगी रुग्णालयात अनधिकृत पणे गर्भपात होत असल्याची तक्रार जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे केली होती यानंतर काल रात्री उशिरा धुळे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्ता देगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधिकाऱ्यांनी सापळा रचत संबंधित डॉ.भानुदास पाटील (शिंदे) यांच्या महालक्ष्मी क्लीनिक येथे छापा टाकला असता या ठिकाणी गर्भपात करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधे आढळून आली. दरम्यान रात्री उशिरापर्यंत आरोग्य अधिकाऱ्यांनी कायदेशीर कारवाई करत मोहाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या तक्रारीचे पत्र प्राप्त होतात येथील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली व त्यानंतर त्यांनी गेल्या दोन दिवसापासून या भानुदास पाटील (शिंदे) यांच्या महालक्ष्मी क्लिनिकवर पाळत ठेवून होते या संदर्भात सदर डॉक्टरांच्या पथकाने स्टिंग ऑपरेशन करीत डमी पेशंट त्या ठिकाणी पाठवल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. यानंतर काल रात्री उशिरापर्यंत सदरची कारवाई सुरू असल्याची देखील माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्ता देगांवकर यांनी यावेळी दिली.
विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या तक्रारीवरून सदर कारवाई केली असली तरी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा झोपेचे सोंग घेऊन अनधिकृत गर्भपात सेंटर चालविणाऱ्या पाठीशी घालतात का ? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
