अहिल्यादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अवधान येथे प्लास्टिक संकलन मोहीम संपन्न

0

 


अहिल्यादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अवधान येथे प्लास्टिक संकलन मोहीम संपन्न 

जनसंघर्ष न्यूज 

       धुळे:- तालुक्यातील श्री सतीदेवी ट्रस्ट बोरीस संचलित, अहिल्यादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अवधान ता. जि. धुळे येथे गुरुवार दि. 17 जुलै 2025 रोजी विद्यालयाचे प्राचार्य श्री ए डी चौधरी यांच्या मार्गदर्शनाने व स्वच्छ भारत मिशन टप्पा 2 या शासन आदेशान्वये 'उघड्यावर दिसणाऱ्या प्लास्टिक कचरा संकलन मोहीम' राबविण्यात आली.

        परिपाठाचे वेळी प्राचार्य श्री ए डी चौधरी यांनी विद्यार्थ्यांना  'आपली स्वच्छता  आपले आरोग्य' या विषयावर माहिती सांगून स्वच्छता व आरोग्य यांचे महत्त्व पटवून दिले.विद्यालयातील पर्यवेक्षक श्री आर बी पवार, सर्व प्राध्यापक,सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांच्या सहकार्याने परिसरातील प्लास्टिक कचरा संकलन करून त्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.

        प्लास्टिकचे दुष्परिणाम या विषयावर विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. दैनंदिन वापरातील प्लास्टिक पिशवीला पर्याय म्हणून पर्यावरण पूरक कापडी व कागदी पिशव्यांची निर्मिती विद्यार्थ्यांकडून करण्याबाबत नियोजन करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)