शासनाच्या मोठमोठ्या योजना येऊनही कापडणेकरांची तहान अद्याप भागेना ; आजही गावाला दूषित पाणीपुरवठा

0


शासनाच्या मोठमोठ्या योजना येऊनही कापडणेकरांची तहान अद्याप भागेना ; आजही गावाला दूषित पाणीपुरवठा

 कापडणे कर जनतेने आत्तापर्यंत 8 कोटी 45 लाख 80 हजार रुपये केले पिण्याच्या पाण्यावर खर्च


कापडणे कर जनतेला केव्हा मिळेल पिण्या योग्य पाणी, योग्य खुलासा केला नाही तर 15 ऑगस्ट पासून आमरण उपोषण

जनसंघर्ष न्यूज 

धुळे ( कापडणे ) :-  तालुक्यातील कापडणे गावातील सामाजिक कार्यकर्ते भूषण ब्राम्हणे व स्थानिक नागरिकांनी कापडणे ग्रामपंचायतीला कापडणे गावात अनेक वर्षापासून होणाऱ्या दूषित पाणी पुरवठा लवकरात लवकर बंद करून नागरिकांना पिण्यायोग्य पाणी द्यावे अन्यथा 15 ऑगस्ट पासून आमरण उपोषण करण्यात येईल अशा मागण्यांचे निवेदन गावातील प्रथम नागरिक अक्काबाई भील व ग्रामस्थ अधिकारी भामरे मॅडम यांना देण्यात आले. सदर निवेदनाचा विचार योग्य न झाल्यास 15 ऑगस्ट 2025 पासून आमरण उपोषणाला बसणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते भूषण ब्राह्मणे यांनी दिली आहे . 

          याबाबत सविस्तर वृत्त असे की, धुळे जिल्ह्यातील कापडणे गावाची क्रांतिकारी गाव म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे आणि याच क्रांतिकारी गावात गेल्या पाच ते सहा वर्षांपासून येथील नागरिक शुद्ध पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत. याबाबत तक्रारी निवेदनामध्ये पुढील प्रमाणे गोष्टींचा खुलासा करण्यात आलेला आहे. साधारण गेल्या पाच ते सहा वर्षापासून किंवा त्याच्यापेक्षा जास्त वर्षापासून कापडणे गावात ग्रामपंचायतीमार्फत शुद्ध व स्वच्छ जे पिण्यायोग्य आहे. अशा पिण्याचा पाण्याचा पुरवठा होत नाही. म्हणून माझ्यासोबत सर्वसामान्य नागरिकांवर मासिक 450 ते 500 रुपयापर्यंत खर्चाचा बोजा पडत आहे. आणि त्याच पाचशे रुपयांचे वार्षिक रूपांतर 6000 सहा हजार रुपयांमध्ये होते. म्हणून कापडणे गावात किमान 26 ते 2700 कुटुंब वास्तव्यात आहेत ते प्रत्येक कुटुंब आज फिल्टर पाणी प्रतीजार पंधरा रुपये प्रमाणे खरेदी करत आहे. म्हणजे 2700 × 15 = 40500 प्रति दिवस कापडणे येथील नागरिक पिण्याच्या पाण्यावर खर्च करत आहेत. व तोच खर्च महिन्याला पकडला तर 40500 × 30 =12 लाख पंधरा हजार होतो. व तोच खर्च वार्षिक पकडला तर 1215000 × 12 = 1 कोटी 45 लाख 80 हजार होतो. आतापर्यंत सहा वर्षाचा हिशोब आपण केला तर. 14580000 × 6 = 8 कोटी 74 लाख 80 हजार रुपये कापडणे गावातील नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासाठी खर्च केलेले आहेत आणखी किती दिवस कापडणेकरांनी गप्प बसावं असा सवाल निवेदनातून करण्यात आला आहे.

         शासनाच्या आलेल्या पाणीपुरवठा संदर्भातील सर्व योजना बिनकामी ठरलेल्या आहेत त्यात कापडणेकरांना कोणाताच उपयोग झालेला नाहीये. मराठी शाळा क्रमांक एक गडीवर पाणी फिल्टर बसवले त्याचे देखील एक ग्लास पाणी कापडणे कर जनतेला मिळाले नाही. व ते आता कुठे आहे हे कोणालाच माहिती नाही. म्हणून गावकऱ्यांनी कापडणे ग्रामपंचायतीला नम्र विनंती केली आहे की आपण कापडणे गावाला स्वच्छ व पिण्यायोग्य पाणी केव्हा पाजणार याचा खुलासा सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्राम विस्तार अधिकारी व पाणीपुरवठा समितीतील सर्व सदस्यांनी लेखी स्वरूपात द्यावा. या संदर्भात कोणत्याही प्रकारचे ठोस पावले उचलले गेली नाही तर सामाजिक कार्यकर्ते भूषण ब्राह्मणे व स्थानिक नागरिक येणाऱ्या 15 ऑगस्ट रोजी आमरण उपोषणाला बसणार आहे. आपण माझ्या अर्जाचा व कापडणे कर जनतेचा विचार करून योग्य तो खुलासा व योग्य ती पावले  उचलून न्याय द्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे

        निवेदनाची प्रत माहितीस्तव सादर मा. पालकमंत्री धुळे मा. जिल्हाधिकारी महोदया धुळे मा. गटविकास अधिकारी धुळे  मा. जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग धुळे यांना देखील याच दिवशी देण्यात आले. सदर निवेदन देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते भुषण ब्राम्हणे, विनोद भामरे, प्रणव बच्छाव, सचिन मोरे, राकेश निकम, राकेश ब्राम्हणे व पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)