डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे येथे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अभ्यासक्रमांचे शैक्षणिक सत्र जुलै-२०२५ करिता प्रवेश सुरु

0


डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे येथे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अभ्यासक्रमांचे शैक्षणिक सत्र जुलै-२०२५ करिता प्रवेश सुरु

जनसंघर्ष न्यूज 

    धुळे :-  डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे (प्र.ल.) ता. जि.धुळे येथिल यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत अभ्यासकेंद्र सन २०१२-१३ पासून सुरु असून सदर अभ्यासकेंद्रात 'मानव्यविद्या व सामाजिक विद्याशाखा' अंतर्गतचे मानवी हक्क प्रमाणपत्र शिक्षणक्रम आणि संमंत्रक प्रशिक्षण प्रमाणपत्र शिक्षणक्रम  हे अभ्यासक्रम सुरु आहेत तर शै. वर्षे- २०२५-२६ पासून 'शिक्षणशास्त्र विद्याशाखा' अंतर्गत स्वयं सहाय्यता समूह मुलभूत प्रमाणपत्र हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे.

      हे अभ्यासक्रम सुरु करण्याचा 'समता शिक्षण संस्था, पुणे' चा मुख्य उद्देश म्हणजे समाजातील गरीब,वंचित घटकांना काम करता करता शिक्षण, नोकरी व्यवसाय करता शिक्षण घेता येईल आणि समाजाच्या तळागाळातील सर्वांपर्यंत गरजेनुसार शिक्षण पोहचविणे  म्हणजेच 'ज्ञानगंगा घरोघरी'  हे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे ब्रीदवाक्य  ही सफल होईल आणि राष्ट्राच्या व राज्याच्या विकास आराखड्यांशी समन्वय साधून, आपल्या विकासविषयक गरजांना अनुरूप विविध शिक्षणक्रम उपलब्ध करून देणे हे संस्थेचे ध्येय आहे.

      या  तिन्ही अभ्यासक्रमाचे उपयुक्तता -प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी, अंगणवाडी सेविका, महिला बचतगट, आरोग्य सेविका ,बालसंगोपन व गैरसरकारी संस्थांमधील स्वयंसेवी कार्यकर्त्यांना हे शिक्षणक्रम अत्यंत उपयुक्त आहेत. तसेच विविध दैनिके ,नियतकालिकांमध्ये काम करणारे पत्रकार व पत्रकारितेच्या विद्यार्थांना हे शिक्षणक्रम महत्वाचे  आहेत.

     सदर अभ्यासक्रमांचे शैक्षणिक सत्र जुलै-२०२५ करिता प्रवेश देणे सुरु झाले आहे, प्रवेश क्षमता मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर परिसरातील विद्यार्थांनी  प्रवेश घ्यावा असे आव्हान अभ्यासकेंद्राचे केंद्र प्रमुख डॉ. जालिंदर अडसुळे यांनी केले आहे. प्रवेश सबंधित विद्यार्थांना काही अडचणी असतील तर अभ्यासकेंद्राचे सहाय्यक श्री सुभाष बागुल, श्री गणेश उफाडे, यांच्याशी अभ्यासकेंद्रात संपर्क करावा असे सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)