पुना कॉलेजमध्ये सीईओ डॉ. सैय्यद वकील यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक व सामाजिक उपक्रम
जनसंघर्ष न्यूज
पुणे (प्रतिनिधी) :- पुण्यातील ए. के. इन्स्टिट्यूटच्या पुना कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्समध्ये कॉलेज एक्झामिनेशन ऑफिसर (सीईओ) आणि संशोधन मार्गदर्शक डॉ. सैय्यद वकील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमात FYBCOM अभ्यासक्रमासाठी ‘फंडामेंटल्स ऑफ मार्केटिंग’ या पुस्तकाचे प्राचार्य डॉ. इक्बाल शेख यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. याशिवाय, करिअर मार्गदर्शन व व्यक्तिमत्व विकासासाठी डॉ. वकील यांच्या जागतिक ब्लॉगचे उद्घाटन झाले, ज्याचा ८५ हून अधिक देशांतील वाचक लाभ घेत आहेत. इंग्रजी भाषेतील आत्मविश्वास वाढवण्यासाठी ‘डॉ. वकील इंग्लिश क्लब’ या व्हॉट्सअॅप कम्युनिटीची सुरुवात करण्यात आली.
यावेळी डॉ. वकील यांनी वाय अँड एम एकेआय ट्रस्ट, मुंबईमार्फत एका अनाथ मुलाचे पालकत्व स्वीकारून सामाजिक बांधिलकी जपली.
कार्यक्रमाला प्रभारी रजिस्ट्रार ॲडव्होकेट इस्माईल सय्यद, आयक्यूएसी समन्वयक डॉ. शिरीन शेख, कॉमर्स विभाग प्रमुख डॉ. नसरीन खान आणि अन्य प्राध्यापक उपस्थित होते. शेवटी प्राचार्य डॉ. इक्बाल शेख यांनी सर्वांचे आभार मानले आणि राबवलेल्या उपक्रमांचे विद्यार्थ्यांना व समाजाला मोठे योगदान ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

