मालमत्ता कर, शासनास जमा होणाऱ्या उपकरांची टक्केवारी रद्द करा - शिवसेना उबाठाचे घंटानाद आंदोलन

0

 


मालमत्ता कर, शासनास जमा होणाऱ्या उपकरांची टक्केवारी रद्द करा -  

 शिवसेना उबाठाचे घंटानाद आंदोलन 

 जनसंघर्ष न्यूज 

      धुळे :-  धुळे महानगरपालिका मालमत्ता कर विभागाच्या वतीने यंदाच्या वर्षी धुळेकरांना मालमत्ता करामध्ये 26 टक्के वरून 36 टक्के वाढ केल्याने अवाच्या सव्वा बीले आलेली आहेत, धुळे शहराच्या विद्यमान आमदार अनुप अग्रवाल यांनी  मागणी केल्यानुसार महानगरपालिका आयुक्त यांनी 36 टक्के वरून 30 टक्के आकारणी करण्याचे जाहीर केले, धुळे महानगरपालिकेने मालमत्ता मोजणी संदर्भात ठेका दिलेल्या स्थापत्य कन्सल्टंट अमरावती या कंपनीने मालमत्ता मोजताना वाढीव मालमत्ता मोजल्याचे निदर्शनास आल्याने , लोकप्रतिनिधींनी मागणी केल्याने राज्य विकास मंत्री माधुरी मिसाळ यांनी धुळे करांच्या मालमत्तांचे पुर्णरमोजणी करून नव्याने मालमत्ता करांची बिले सादर करावीत आदेश धुळे महानगरपालिकेला दिले आहेत,

     संबंधित ठेकेदाराकडून मालमत्ता या जास्तीच्या मोजल्या गेलेल्या आहेतच पण या मालमत्तांवर मालमत्ता कर आकारताना इतर  विविध प्रकारचे सोळा कर देखील आकारले जात असून यात महाराष्ट्र राज्य शासनाच्या काही कर असून या करांचा मोबदला थेट राज्य शासनाच्या खात्यात जमा होतो.

       यात प्रामुख्याने महाराष्ट्र शिक्षण कर, रोजगार हमीकर, मोठ्या निवासी जागा कर यांचा समावेश असून धुळेकरांना आलेल्या मालमत्ता कराच्या वाढीव-बिलांमध्ये या करांचा जास्त पैसा आकारण्यात आलेला आहे. 

       यामध्ये  एकूण मालमत्ता  कराच्या 6,% निवासी, 12% कमर्शियल असा महाराष्ट्र शिक्षण कर  लावण्यात आलेला असून रोजगार हमी कर 3% , मोठ्या निवासी जागेवरील कर 10% इतका आकारण्यात आल्यामुळे ही सर्वच्या सर्व बिले अव्वाच्या सव्वा स्वरूपात आकारलेली दिसून येत आहेत, ‌ त्यामुळे महाराष्ट्र राज्य शासनाच्या खात्यात जमा होणाऱ्या या करांच्या टक्केवारीचे प्रमाण कमी करण्यात यावे, त्यातच धुळे महानगरपालिकेने सन 1992- 93 पासून मालमत्ता करांमध्ये वेळोवेळी रिर्व्हिजन न केल्याने एकाच वेळी सर्व सुधारणा करून हा मालमत्ता कर आकारलेला आहे. त्यामुळे मालमत्ताकारांचे बिल धुळेकरांना त्यांच्या उत्पन्नापेक्षा जास्तीचे आलेले आहेत. धुळे महानगरपालिकेचा  समावेश ड वर्ग महानगरपालिकांमध्ये होत असून, दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यांमध्ये धुळे जिल्ह्याचा शेवटून दुसरा क्रमांक लागतो. त्यामुळे येथील मालमत्ता धारकांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असून धुळे शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणात चाळीस टक्के दारिद्र्यरेषेखालील 30% मध्यमवर्गीय 40 टक्के उच्च वर्गीय 20 टक्के असून मालमत्ता करांमध्ये महाराष्ट्र राज्य शासना कडे जमा होणारे  करांची टक्केवारी आपण स्वतः माननीय नगरसचिव यांची भेट घेऊन कमी करण्यास सहकार्य करून सर्व ड वर्ग महानगरपालिकांना व त्या महानगरपालिकेतील मालमत्ता धारकांना दिलासा द्यावा  यासाठी शिवसेना उबाठा वतीने आज महानगरपालिका आवारात  घंटानाद आंदोलन करत मनपा प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

       याप्रसंगी शिवसेना उपनेत्या शुभांगी पाटील, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, भगवान करणकाळ, नरेंद्र परदेशी धीरज पाटील, भरत मोरे , प्रशांत भदाणे, संदीप सूर्यवंशी, सुनील पाटील, निंबा मराठे ,महिला आघाडीच्या ज्योती चौधरी, अण्णा फुलपगारे, डॉ. अनिल पाटील, सुनील चौधरी,शिवाजी शिरसाळे विकास शिंगाडे महादु गवळी, पंकज भारस्कर, विवेक सूर्यवंशी, कपिल लिंगायत, सुभाष मराठे मुन्ना पठाण, सागर निकम, अजय चौधरी, नितीन देशमुख  राजू दहातोंडे, पिंटू ठाकूर, गोकुळ बडगुजर, अमोल ठाकूर अनिल शिरसाट ,शुभम रणधीर, दिनेश गुरव,सागर साळवे, वैभव पाटील, हर्षल वाणी, विष्णू जावडेकर, आशुतोष कोळी, काशिनाथ गवळी आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)