विधानमंडळात रमी खेळणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे याच्या धुळे दौऱ्याला निषेध निदर्शनांचे ग्रहण
शिवसेना उबाठाने घोषणाबाजी करून केला निषेध
जनसंघर्ष न्यूज
धुळे :- महाराष्ट्र राज्याचे कृषी कॅबिनेट मंत्री माणिकराव कोकाटे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथे एका पेट्रोल पंपाच्या उद्घाटनानिमित्त आले असताना, धुळे शहरातील पंचतारांकित असलेल्या हॉटेल टॉप लाईन येथे मुक्कामाला होते आज सकाळी महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळणारे, कृषिमंत्री असून वारंवार शेतकरी विरोधात भूमिका घेणारे , महाराष्ट्र राज्य सरकारच्या विरोधात टिका करणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जोरदार निषेध करून चले जाव चले जाव माणिक कोकाटे चले जाओ, महाराष्ट्र राज्याच्या पवित्र विधिमंडळात मंदिरात जुगार खेळणाऱ्या कृषिमंत्र्यांची हकालपट्टी करा, अशा जोरदार घोषणा देत शिवसेना पक्षाच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले, याप्रसंगी शिवसैनिकांनी काळे झेंडे दाखवत कृषी मंत्र्यांच्या धुळे जिल्ह्या दौऱ्याला प्रचंड विरोध केला, धुळे जिल्ह्यामध्ये महिनाभरापासून समाधानकारक पाऊस नसताना, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले असताना, तसेच धुळे जिल्ह्यातील कांदा व कापूस उत्पादक शेतकरी संकटात असताना त्यांच्या बांधावर न जाता खाजगी पेट्रोल पंपाच्या उद्घाटनासाठी कृषिमंत्र्यांना वेळ मिळतो अशी भूमिका मांडत शिवसेनेच्या वतीने हॉटेल टॉप लाईन येते कृषीमंत्र्यांच्या विरोधात जोरदार निदर्शने व आंदोलन करण्यात आली, शेतकऱ्यांच्या विरोधात वारंवार अपमान जनक वक्तव्य करणारे मंत्र्यांची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी करत सुमारे दोन तास भर शिवसैनिकांनी कृषीमंत्र्यांना हॉटेल टॉप लाईन बाहेर पडुच दिले नाही, यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी महानगर प्रमुख धीरज पाटील, भरत मोरे, प्रशांत भदाणे, निंबा मराठे, तालुका प्रमुख बाबाजी पाटील, हेमराज पाटील, गजेंद्र पाटील, अण्णा फुलपगारे, आनंद जावडेकर, कपिल लिंगायत ,शिवाजी शिरसाळे, विकास शिंगाडे, पंकज भारस्कर, सागर निकम, पिंटू ठाकूर, नितीन देशमुख ,अनिल शिरसाट, विष्णू जावडेकर, गोकुळ बडगुजर, वैभव पाटील, केतन भामरे, गुलाब देवरे, मनोज पाटील कुंडाणे, अमोल पाटील , विजय चौधरी, शांताराम माळी, ईश्वर मराठे, सावता माळी महादेव उपस्थित होते.

