अवैध वाळू ,मुरूम माफीया यांचा हैदोस महसुलातील अधिकारी व नागरिकांचे प्राण धोक्यात - शिवसेना उबाठा

0

 

अवैध वाळू ,मुरूम माफीया यांचा हैदोस  महसुलातील अधिकारी व नागरिकांचे प्राण धोक्यात - शिवसेना उबाठा 

जनसंघर्ष न्यूज 

        धुळे -  शहरालगत लळिंग पासून चितोड - रावेर - जुन्नेर - नकाणे - हरण्यामाळ - सांजोरी  वगैरे हा संपूर्ण परिसर मोठ्या प्रमाणावर गौण खनिज माफियांच्या लूटमारीचा अड्डा बनला आहे. महसूल विभागाच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे या पट्टयातून निघणार्‍या कोट्यवधिंच्या मुरुम - माती - डबर सारख्या गौण खनिजांची शासकीय रॉयल्टी बुडत आहे. टेकड्या साफ होत आहेत व पर्यावरणाची अपरिमित हानी होत आहे. कोट्यवधिंच्या या चोरी महोत्सवात काही ग्राउंड लेव्हलची मंडळी लाखोंच्या चिंधीचोरीत  गुंग आहेत. या सर्व गौण खनिज लूट महोत्सवा बाबत  महसूल प्रशासन व धुळे तहसीलदार, अनभिज्ञ असल्याचा देखावा करीत आहे. 

       परवा संभाजीनगरला जाताना  दस्तरखुद्द जिल्हाधिकारी महोदयांनी गरताड गावाजवळ एक अवैधरित्या वाहतूक करणारा हायवा पकडला, जिल्हाधिकाऱ्यांशी देखील मुजोरी करण्यास त्या वाहन चालकांनी मागे पुढे पाहिले नाही, रात्री अपरात्री होणारी ही वाहतूक आता महसूल कर्मचाऱ्यांसोबत नागरिकांच्या देखील जीवावर उठली आहे कारण धुळे शहराच्या चहुबाजूला राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या वेळी भरधाव वेगाने जाणारे हायवा आता नागरिकांच्या जीवावर देखील उठले आहे त्यामुळे रात्री प्रवास करणे देखील धोक्याचे बनले आहे.

       मागील काही महिन्यात, नकाणे तलावाच्या वरच्या बाजुस हरण्यामाळ तलावाकडे जाताना लागणार्‍या अनेक टेकड्यांपैकी एका टेकडीची खोदाई करून प्रचंड गौण खनिज वाहून नेण्यात आले. इतके की काही दिवसांनी त्या टेकडीचे अस्तित्वच संपून टाकले आहे, काही ठेकेदार हे गौण खनिज राष्ट्रीय महामार्ग साठी नेत असल्याचा बनाव निर्माण करतात, लळींग - एमआयडीसी तलाव - हिरे मेडिकल  -मोती नाला- रावेर गावाची वरची सीमा -नंदा भवानी - नकाणे व हरण्यामाळ परिसराची स्वतःची एक इको सिस्टीम आहे. हा निसर्गरम्य परिसर आहे. या ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर परदेशी पक्षी येत असतात. पर्यावरणप्रेमीही या ठिकाणी पक्षी निरिक्षणासाठी येत असतात. या पर्यावरणास आता विविध मानवी हस्तक्षेपांमुळे हानी पोहोचू लागली आहे.पर्यावरणीय जलस्रोत परिसरात सतत वाढता मानवी हस्तक्षेप ही चिंतेची बाब बनली आहे. आता हायवेच्‍या भराव कामास व विविध ले - आउट च्या भराव कामासाठी बाहेरून टेकड्याच्या टेकड्या साफ करण्याचा  सपाटा सुरु झाला आहे. साक्री रोड डायव्हर्शनने चक्कर मारली तरी अशा टेकड्या दहा दहा पोकलॅन्ड लावून सफाटच केल्याचा शांतुषा  प्रकार सहज लक्षात येतो. हायवे भराव व ले आउट  भराव साठी टेकड्या संपविण्याच्या या धुळ्यात मात्र वर्षानुवर्ष बिल्डर - प्लॉट धंदेवाल्यांनी चक्कर बर्डी ची शे-पन्नास एकर जमीन खंडर बनवून टाकली आहे. आता थेट लळिंग डोंगरापासून - नकाणे - हरण्यामाळ - रावेर - जुन्नेर - दह्याने - बह्याने - सांजोरी व संपूर्ण  डोंगराळ - बरड पट्टयात गौण खनिज चोरीवाले धुम सुटले आहेत.  या भागात रात्रीच्या वेळी शेकडो हायवा मुरूम उत्खनन करून पहाटेपर्यंत माल पोचहुन रिकामे होतात, ना. गडकरींनी हायवेच्या भरावासाठी नदी नाले तलाव - धरणे यांच्या खोलीकरणासाठी व पाणी साठा वाढी साठी तेथील गाळ काढण्याचे धोरण आणले होते. चांगले धोरण आहे. प्रशासनाकडून असा ' गाळ  काढण्याचा परवाना घ्यावयाचा आणि चक्क टेकड्या खणावयाच्या '  असा प्रकार सर्रास सुरु आहे. शहरात नवीन ले - आउट वालेही  अशी प्रचंड अवैध  गौण खनिज वाहतूक करून नेतात. लगतच्या खड्डे, नदी,  नाले यात भराव करून नवीन जमीन निर्माण करतात. व कोट्यवधींची  उलाढाल करतात. धुळे शहरातील संबंधित तहसीलदार  तलाठी - सर्कल यांना हा सर्व प्रकार माहित  असून फक्त कागदावर कारवाई केली जात आहे, स्वतःहून त्यांनी अद्याप पर्यंत किती ठिकाणी  रिपोर्ट  केले हा संशोधनाचा भाग आहे ,एखाद्या प्रकरणात तक्रार आलीच तर कसा अहवाल सादर करतात? या गोष्टीही बघण्या सारख्या आहेत. धुळे तहसीलदार सर्कल तलाठी व गरिब महसूलवाल्यांनी कुठल्या कारणांमुळे डोळेझाक केली आहे? या प्रश्नाचे उत्तर सर्वजण जाणतात.  या गौण खनिज ठेकेदारांच्या अवैध उत्खननामुळे राष्ट्रीय महामार्ग तसेच ग्रामीण भागात चालणाऱ्या यांच्या हायवा मुळे आता तर हायवेला  वाहन चालवणे देखील आम जनतेस कठीण होऊन बसले असून, अत्यंत भरधाव वेगाने जीवाची पर्वा न करता हे वाहतूक करणारे वाहन चालक खाजगी वाहन चालकांच्या अंगावर गाड्या घालत असून अनेक ठिकाणी अपघात देखील होत आहेत, अनेक ठिकाणी इतर कारवाईला गेलेल्या महसूल कर्मचाऱ्यांवरती देखील यांनी आपली वाहने जीवे ठार मारण्याचे उद्देशाने त्यांच्या अंगावर घातले आहेत,

      या सर्व पट्ट्यात होणारी गौण खनिज वाहतुकी संदर्भात शिवसेना उबाठा कडे महत्वपूर्ण रेकॉर्डिंग असून, यात कोणा कोणाची ठेकेदारी आहे महसूल मधील कोणते अधिकारी यांना पाठबळ देत आहेत, तसेच धुळे शहरात गेल्या दोन महिन्यात कुठे कुठे यांनी मालाचे डेपो बनवलेले आहेत याची सर्व माहिती आमच्याकडे असून, ती नासिक विभागीय महसूल आयुक्तांकडे आपण योग्य ती कार्यवाही न केल्यास सुपूर्त केली जाणार आहे, आपणास विनंती आहे की येत्या आठ दिवसात धुळे शहरालगत होणारी ही गौण खनिज वाहतूक व अवैध उत्खनन लवकरात लवकर बंद झाले पाहिजे, धुळे शहरालगत अवैद्य  वाळू ,मुरूम, डबर, खडी गौण खनिज बेकायदेशीर कोट्यावधी रुपयांच्या शासनाचा महसूल बुडवून अधिकाऱ्यांच्या संरक्षणात मुजोर झालेले असुन ते कोण आहेत हे धुळे करा समावेश तुम्हाला देखील माहित असून  त्यांच्यावर कारवाई  न झाल्यास शिवसेना उबाठा आपल्या कार्यालयासमोर जोपर्यंत कार्यवाही होत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण करेल, याची आपण नोंद घ्यावी. अशा आशयाचे निवेदन आज शिवसेना उपनेते शुभांगी पाटील जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, माजी महापौर भगवान करणकाळ उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी महानगर प्रमुख धीरज पाटील,भरत मोरे, प्रशांत भदाने,निंबा मराठे सुनील पाटील,आण्णा फुलपगारे, आनंद जावडेकर, महिला आघाडीच्या ज्योती चौधरी, महादू गवळी, शिवाजी शिरसाळे, कपिल लिंगायत, आबा हरळ , अजय चौधरी, सागर निकम,ईशतियाक अंसारी, विष्णू जावडेकर, गोकुळ बडगुजर, प्रदिप बडगुजर , योगेश पाटील आदी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)