सिंचन भवन ते गोदाई सोसायटी रस्ता तातडीने दुरुस्त करा ;शिवसेना उबाठा ने रांगोळी काढून वेधले लक्ष

0

 

सिंचन भवन ते गोदाई सोसायटी रस्ता तातडीने दुरुस्त करा 

      शिवसेना उबाठा ने रांगोळी काढून वेधले लक्ष

जनसंघर्ष न्यूज 

धुळे - धुळे शहरातील साक्री रोड परिसरातील सिंचन भवन मागील सिंचन भवनापासून ते राम नगर ला जोडणारा डिपी रस्ता ह्या रस्त्याने नवजीवन इंग्लिश स्कूल, सामाजिक न्याय भवन, त्याचप्रमाणे श्री साई एकता नगर, शिवम् नगर, कृषी नगर, गोदाई कॉलनी, एकता नगर, समर्थ नगर, संगमा चौक इत्यादी अनेक कॉलनी व परिसराला जोडणारा हा मुख्य रस्ता असून दररोज या रस्त्यावरून हजारो नागरिकांची वर्दळ सुरू असते , सदर रस्त्याची गेल्या 2 वर्षांपासून प्रचंड दुरवस्था झाली असून हा रस्ता आता पूर्णतः खड्डेमय झाला आहे. या प्रभागाच्या नगरसेवकांचे या रस्त्याच्या दुरुस्ती कडे  पूर्णतः दुर्लक्ष केले असून स्थानिक सर्व नगरसेवक हे भाजपचे असताना पालिकेत सत्ता भाजपची असताना देखील त्यांच्याकडून या रस्त्याची गेल्या दोन वर्षात साधी डाग दूध देखील करण्यात आलेली नाही ह्या भागात संपूर्ण नोकरदार वर्ग राहत असून हे सर्व नागरिक 100% पालिकेचे कर भरणा करतात , या भागातील नागरिकांनी त्यांना निर्माण होणाऱ्या गैरसोयीबद्दल साधी तक्रार सुद्धा महानगरपालिका प्रशासनाकडे केलेली नसून त्यांच्या गैरसोयीचा अंत बघण्याचे काम पालिकेने आणि भाजपच्या नगरसेवकांनी केले आहे, या सर्वांचा निषेध करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार दि.७ रोजी लक्षवेधी आंदोलन सिंचन भवनाजवळ खड्ड्यांच्या अवतीभवती रांगोळी काढून करण्यात आले याप्रसंगी पालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन युद्ध पातळीवर या रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी करण्यंत आली. प्रभागातील रस्त्यांच्या प्रश्नी शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात आले.. खराब झालेल्या रस्त्याची पूजा करून तसेच भ्रष्टाचारी पालिकेच्या कारभाराला फुले वाहून आणि नारळ फोडून निषेध  ही व्यक्त करण्यात आला.. ह्या प्रसंगी प्रभागातील शिवसेना शहर समन्वयक संदीप सूर्यवंशी, विभाग प्रमुख नितीन देशमुख, सुनील पाटील, नितीन बागुल, लखन वासवानी, विनोद मिस्तरी, गणेश पाकळे, देविदास सोनवणे, खंडू सूर्यवंशी, भूषण सोनकांबळे आदी उपस्थित होते..


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)