बेशिस्त वाहन चालकांची जिरवली मस्ती ; फॅन्सी नंबर प्लेट व कर्कश सायलेन्सर वर फिरवले रोड रोलर
दबंग पोलीस अधिकारी सागर देशमुख व ज्ञानेश्वर वारेंच्या कारवाईने बेशिस्त वाहन चालकांचे धाबे दणाणले
धुळे :- शहरात बुलेटच्या सायलेन्सरमध्ये करत फटाके फोडणारे सायलेन्सर आणि चित्रविचित्र नंबर प्लेट शहर वाहतूक शाखेने गोळा केल्या होत्या. त्यावर रोडरोलर फिरविण्यात आला. ही कारवाई शहरातील बारा पत्थर चौकात करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहनाच्या सायलेनसरमध्ये फेरफार करण्याचे प्रकार वाढलेलेआहेत. यात बुलेट या दुचाकीचे प्रमाण अधिक आहे. अशा बुलेटचालक हे शहरात फिरत असताना फटाके फोडत जात असतात. कॉलन्यामध्ये फिरत असतात सध्या त्याचे प्रमाण अधिक होत आहे. या त्रासाला सामान्य जनता वैतागली होती.
यामुळे शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी अशा बुलेटस्वारांवर कारवाई करण्याची मोहीम पदभार स्विकारताच सुरु केली होती. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी आपल्याकामाचा दबदबा या विभागात निर्माण केला आहे. ४० ते ४५ सायलेन्सर आणि विचित्र नंबर प्लेट एकत्र करुन त्यावर आज सकाळी रोडरोलर फिरविण्यात आला सर्व एकाच वेळी नष्ट करण्यात आले. ही कारवाई शहरातील बारा पत्थर चौकात आज सकाळी करण्यात आली, यावेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा झाली होती. कारवाईप्रसंगी पोलीस उपअधीक्षक सागर देशमुख, शहर वाहतूक पोलीस निरीक्षक यांच्या सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश महाले पोलीस उपनिरीक्षक जयराज शिंदे, विनायक दाणे, सहायक पोलीस उपनिरीक्षक मोहसीन मिर्ग, भूषण जगताप, अब्बास शेख, कर्मचारी शिरीष मयाणे, किसन चौधरी, सुनील पाटील, तीसिफ शेख, भूषण शेट्ये, मयूर पाटील, राहुल चौधरी, इरफान शेख, नितीन ओतारी आदी कर्मचारी कारवाईप्रसंगी उपस्थित होते.

