निखिल पाटील खून प्रकरणात मयूर शार्दुल सह दोघं भावांना न्यायालयाने सुनावली आजन्म कारावासाची शिक्षा

0

 

  निखिल पाटील खून प्रकरणात मयूर शार्दुल सह दोघं भावांना न्यायालयाने सुनावली आजन्म कारावासाची शिक्षा

 जनसंघर्ष न्यूज 

       धुळे :- शहरातील मिल परिसरातील निखिल साहेबराव पाटील या तरुणाच्या निर्घृण खून प्रकरणात त्याच्या  निखिलच्या कुटुंबातील सख्खाभाऊ, आई, मामा यांच्यासह चौघे फितुर होऊन देखील सरकारी पक्षाने परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडत निखिलला न्याय मिळवून दिला. याप्रकरणात मिल परिसरातील मयुर शार्दूल,मनोज शार्दृल आणि मुकेश शार्दूल या तिघां भावांना न्यायालयाने दोषी ठरवत आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. आजन्म कारावासाबरोबरच 5 हजार रुपयांचा दंडही दोषींना न्यायालयाने ठोठावला आहे. धुळे शहरातील स्टेशन रोड, मिल परिसरातील सुरतवाला बिल्डींग जवळील विद्युत नगरात राहणार्‍या निखिल साहेबराव पाटील या तरुणाचा दि.5 रोजी खून झाल्याचे उघडकीस आले होते.

         मयताचा भाऊ दिपक पाटीलने दिलेल्या फिर्यादीनुसार विद्युत नगरात राहणार्‍या मयुर मच्छिंद्र शार्दूल त्याचे भाऊ मनोज आणि मुकेश या तिघांनी दीपकभाऊ निखिलचा मिल परिसरातील स्वराज्य जीम जवळील मयुर शार्दूलच्या मावशीच्या घरात खून केला. मयत निखिल पाटील याच्यासोबत महिलेचे प्रेम संबंध असल्याच्या संशयानंतर दि.27 जानेवारी 2022 पासून निखिल बेपत्ता झाला होता. त्यानंतर समझोत्यासाठी निखिलला बोलवून घेतल्यानंतर मयुर हा निखिलला घेवून मयुर शार्दूलच्या मावशीच्या घरी गेला तेथे मयुर,मुकेश, मनोज या तिघांनी लाकडी दांडक्याने लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन निखिलचा खून केला. शहर पोलिसात तिघांविरुध्द भादंवि 302, 326, 364 (अ), 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणाचा तपास एपीआय दादासाहेब पाटील करीत आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर तिघां भावांना अटक करण्यात आली होती. नंतर त्यांची न्यायालयाने जामिनावर सुटका केली होती. सत्र न्यायाधिश माधुरी आनंद यांच्या कोर्टात याप्रकरणाची सुनावणी झाली. या खून खटल्यात एकूण 12 साक्षीदार होते. त्यापैकी प्रमुख 4 साक्षीदार फितूर झाले. फितूर साक्षीदारांमध्ये मयताचा भाऊ आणि फिर्यादी दीपक पाटील, मयताचा मामा योगेश भटू पाटील, आई वंदना साहेबराव पाटील,अनिल किशोर पाटील यांचा समावेश आहे. मुख्य साक्षीदारच फितूर झाल्याने खटला न्यायालयात टिकणार नाही असा तर्क लावला जात होता. परंतु तपास अधिकारी एपीआय दादासाहेब पाटील यांनी केलेला काटेकोर तपास,अतिरिक्त सरकारी अभियोक्ता संजय मुख्या यांनी केलेला युक्तीवाद, परिस्थितीजन्य पुरावे यामुळे आरोपी दोषी ठरले. सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांनी मयुर, मनोज आणि मुकेश शार्दूल या तिघां भावांना आजन्म कारावास आणि 5 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. अतिरिक्त सरकारी अभियोक्त संजय मुखीया यांना जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड.देवेंद्र तंवर,चंद्रकांत पाटील, भोईटे, जाधव मॅडम यांचे सहकार्य लाभले. एएसआय जडे, पो.कॉ. चव्हाण यांची मदत मिळाली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)