"रस्ता सुरक्षा, वाहतूक समस्या, सायबर सुरक्षा,स्पर्धा परीक्षा यावर कार्यशाळा संपन्न"
जनसंघर्ष न्यूज
धुळे:- गुरु पौर्णिमेच्या अनुषंगाने, माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक श्री दत्तात्रय कराळे यांच्या संकल्पनेतून धुळे जिल्ह्यातील विविध शाळा,महाविद्यालय या ठिकाणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, वाहतूक सुरक्षा समस्या व निराकरण,महिला सुरक्षा,व्यसनाधीनता व त्याचे दुष्परिणाम,तसेच सायबर सुरक्षा या विषयावर मार्गदर्शनपर शिबिरे सुरू करण्यात आली आहे त्या अनुषंगाने शासकीय विद्यानिकेतन, धुळे या ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपेश सतीश काळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तसेच वाहतूक समस्या व त्याचे निराकरण यावर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी आपल्या मार्गदर्शनात आजच्या धावपळीच्या जीवनात वाहतूक समस्या एक गंभीर आव्हान बनली आहे.वाहन चालवताना व्यसन करून अथवा मोबाईल वर बोलू नये,शहरांमध्ये आणि शहरांच्या बाहेरही, वाहतूक कोंडी, अपुरी रस्ते व्यवस्था, आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन यामुळे लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.या समस्येमुळे केवळ लोकांनाच नाही तर पर्यावरण,वेळेचा अपव्यय,अर्थव्यवस्थेवरही नकारात्मक परिणाम होतो.
लोकांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे महत्त्व समजावून सांगणे आवश्यक आहे.वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी शालेय जीवनापासून सुरुवात केली पाहिजे. सतिश काळे यांनी विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची तयारी व ओळख विद्यार्थ्यांना करून दिली.
सदर कार्यक्रमाचे समन्वयक शिक्षक श्री.एस.एम.देसले आणि श्री.एन.बी.वंजारी यांनी नियोजन केले होते.सदर कार्यक्रमास शाळेच्या प्राचार्य डॉ.मंजुषा क्षीरसागर,कुलप्रमुख प्रतिभा ठाकूर,गृहप्रमुख प्रतिभा मेश्राम,सहाय्यक गृहप्रमुख प्रशांत वडनेरे,माधुरी महाले,उपशिक्षिका वनिता पाटील,सुनील देसले,नेहा साळुंखे,सुषमा झोळे,सुनिता डंबाळे,सुरेश बच्छाव,योगिता बैसाणे, सुवर्णा मोहिते,चेतन भामरे, शितल करडक, प्रकाश पवार, कुणाल दामोदर,भावना सोनवणे उपस्थित होते.सूत्रसंचालन विनोद रोकडे आभार प्रतिभा ठाकूर यांनी मानले.

