शहादा पोलिसांनी स्वातंत्र्यदिनी रोखली गांजा तस्करी
2 लाख 72 हजार 640 रुपयांच्या गांजा सह दोन आरोपी जेरबंद
जनसंघर्ष न्यूज
शहादा :- 15 ऑगस्ट रोजी शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले यांना गुप्त माहिती मिळाली की शहरात गांजा विक्री करण्यासाठी पांढऱ्या रंगाच्या दुचाकी वर दोन इसम येणार आहेत. अशी माहिती मिळताच पोलीस निरीक्षक निलेश देसले यांनी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे आणि पोलीस उपविभागीय अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून कारवाई साठी रवाना करण्यात आले असता डीबी पथकाने शहादा प्रकाशा रस्त्यावरील वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्राजवळ सापडा रचून शहादा शहराकडे येणाऱ्या पांढरे रस्त्याची टीव्हीएस दुचाकीवर ( एन एच 18 ए बी 1262 ) दोन तरुण वेगाने येताना दिसले असता त्यांना थांबवून चौकशी केली असता त्यांनी त्यांचे नाव गजन रतन पावरा वय 30 राहणार चाकडू ता . शिरपूर जि.धुळे व गोरख मगन पावरा वय 24 राहणार चाकडू ता. शिरपूर जि.धुळे अशी सांगितले. दुचाकी वरील मागील सीटवर बसलेल्या व्यक्तीकडे पिवळ्या रंगाची प्लास्टिकची गोणी व पाठीवर बॅग असल्याचे पथकाला निदर्शनास आले असता त्यांना विचारपूस केली असता त्यांनी उडवा उडवीचे उत्तर दिले. त्यांच्यावर संशय आला असता त्यांची जळती घेताना त्यांच्या जवळ असलेल्या गोणी मध्ये व बॅग मध्ये गांजा सदृश्य पदार्थ मिळत आला चौकशीअंती त्यांनी गांजा असलेले मान्य केले. त्यांच्याकडून 10 किलो 632 ग्रॅम गांजा व दुचाकी असा सुमारे 2 लाख 72 हजार 640 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून दोघं आरोपींना अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सूर्यवंशी करीत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस , अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश देसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप वाघ, उपनिरीक्षक गणेश मराठे, पोलीस नाईक दीपक चौधरी, पोलीस शिपाई भगवान साबळे, प्रदीप वाघ, विक्की शिंपी, विकास शिरसाठ, सचिन काकडे तसेच होमगार्ड नारायण कानडे यांनी केली.

