देशापेक्षा कोणीही कधीही मोठा नव्हता, ना असेल ना राहील :-शिफूजी शौर्य भारद्वाज
तिरंगा ध्वज यात्रेला धुळेकर जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद आमदार अग्रवाल यांनी मानले आभार
हिंदवी स्वराज्य संघटनेतर्फे धुळ्यात ११११ फूट तिरंगा ध्वज पदयात्रा
धुळे, ता. १४ : देशापेक्षा कधीही कोणी मोठा नव्हता, ना असेल, ना राहणार. प्रत्येकाने स्वतःचा आदर करायला शिका, स्वतःचे आरोग्य सांभाळा, सकाळी लवकर उठून व्यायाम करा. मोबाईलपासून थोडे लांब राहा. आपल्या राष्ट्राचा अभिमान असलेल्या तिरंगा ध्वजाला सर्वांत वरचे स्थान द्या. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक शूरवीरांनी आपले प्राण त्यागले. छत्रपती शिवाजी महाराज, वीर महाराणा प्रताप, बाप्पा रावल यांच्यासारख्या महान विभूतींनी परकियांची आक्रमणे परतावून लावण्यासाठी आपले आयुष्य वेचले. या सर्वांचा आदर करा आणि देशासाठी जगा, असे आवाहन प्रख्यात फ्री लान्स कमांडो मेंटर व कमांडो ट्रेनर, तथा मिशन प्रहारचे संस्थापक ग्रँडमास्टर शिफूजी शौर्य भारद्वाज यांनी केले.
अखंड भारत संकल्प दिनानिमित्त शहराचे आमदार अनुप अग्रवाल आणि हिंदवी स्वराज्य संघटनेतर्फे आज ११११ फूट तिरंगा ध्वज पदयात्रा काढण्यात आली. या भव्य पदयात्रेत शिफूजी शौर्य भारद्वाज, आमदार अनुप अग्रवाल, माजी आमदार कुणाल पाटील, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजिज शेख, महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा धरती देवरे, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. सुशील महाजन, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, बेटी बचाव-बेटी पढाव्या प्रदेश संयोजिका अल्पा अग्रवाल, माजी महापौर चंद्रकांत सोनार, माजी महापौर प्रदीप कर्पे, माजी महापौर प्रतिभा चौधरी, माजी महापौर जयश्री अहिरराव, भाजपचे ज्येष्ठ नेते विजय पाच्छापूरकर, हिरामण गवळी, आयोजक हिंदवी स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रोहित चांदोडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, विविध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संस्था संघटनांचे पदाधिकारी, शहरातील विविध शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी, शिक्षक आणि धुळेकर आबालवृद्ध स्वयंस्फूर्तीने मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आज सकाळी शहरातील अग्रसेन महाराज चौकातून या तिरंगा ध्वज पदयात्रेला प्रारंभ झाला. पुढे डीजेच्या तालावर वाजविल्या जाणाऱ्या देशभक्तिपर गीतांमुळे अभूतपूर्व वातावरण निर्माण झाले होते. सर्वांत पुढे शिफूजी शौर्य भारद्वाज, आमदार अग्रवाल, जिल्हाधिकारी विसपुते, जिल्हा पोलिस अधीक्षक धिवरे, आयुक्त दगडे-पाटील, डॉ. महाजन, श्री. अंपळकर आदींच्या मागे ११११ फुटांचा ध्वज हाती धरत विद्यार्थी, सर्वपक्षीय पदाधिकारी व नागरिक सहभागी झाले होते. अग्रसेन चौकापासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, आग्रा रोडने पाचकंदील, जमनालाल बजाज रोड चौक, श्रीराम धाम चौक, फुलवाला चौकमार्गे ही पदयात्रा महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत पोहोचली. या पदयात्रेत विविध क्षेत्रांतील महिला-पुरुष, ज्येष्ठ नागरिक, युवक-युवती उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यात अनेकांनी भारत माता की जय, वंदे मातरम आदी देशभक्तिपर घोषणांनी शहर दणाणून सोडले. सुमारे एक तास चाललेल्या या तिरंगा ध्वज यात्रेतून अखंड भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी धुळेकर जोरदार बळ देत पदयात्रा यशस्वी केली.
समस्त धुळेकरांचे आमदार अनुप अग्रवाल यांनी मानले आभार
तिरंगा ध्वज यात्रेचा शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ समारोप झाला. तेथे प्रारंभी हिंदवी स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रोहित चांदोडे यांनी प्रास्ताविकात पदयात्रेचा उद्देश स्पष्ट केला. यानंतर शिफूजी शौर्य भारद्वाज यांनी मार्गदर्शन केले. आमदार अग्रवाल यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, की अखंड भारत संकल्प दिनानिमित्त आज ही ११११ फूट तिरंगा ध्वज पदयात्रा काढण्यात आली. या यात्रेचे हे सहावे वर्ष आहे. यंदाही या पदयात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. शहरातील अनेक शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी, शिक्षकांनी सहभागी झाले. त्यांच्यासह शैक्षणिक संस्थांचे अध्यक्ष व पदाधिकारी, धुळेकर आबालवृद्ध नागरिक आणि संयोजक टीमचे मी मनापासून आभार मानतो. शहरात राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध विकासकामे सुरू आहेत. आपल्याला एका दूरदृष्टीच्या व्हीजनने वाटचाल करत शहराचा चेहरा-मोहरा बदलायचा आहे. या परिवर्तनाच्या लाटेत शहरातील प्रत्येक नागरिकाचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे. आज धुळ्यात जी शांतता नांदते आहे, त्याचे श्रेय प्रशासनातील अधिकाऱ्यांना आहे. या आग्रा रोडवर व्यवसाय करणाऱ्या गोरगरीब विक्रेते, फेरीवाल्यांना जागेसाठी आजच आम्ही बैठक घेत आहोत. त्यातून सर्वमान्य तोडगा काढण्यात येईल. ज्या समस्या-अडचणी आहेत, त्या समन्वयातून सोडविण्याचा प्रयत्न करत आहोत.
राष्ट्रगीताने पदयात्रेचा समारोप
शेवटी महात्मा गांधी पुतळ्याजवळील स्तंभावर तिरंगा ध्वज फडकवून राष्ट्रगीताने पदयात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्व नागरिकांनी भारतीय तिरंगा ध्वजाला सलामी दिली. या तिरंगा ध्वज पदयात्रेत मायादेवी परदेशी, महादेव परदेशी, वैशाली शिरसाट, ओमप्रकाश खंडेलवाल, यशवंत येवलेकर, चेतन मंडोरे, सुनील बैसाणे, संदीप बैसाणे, पृथ्वीराज पाटील, आकाश परदेशी, संजय बोरसे, राजेंद्र खंडेलवाल, प्रथमेश गांधी, पंकज धात्रक, पवन जाजू, ज्ञानेश्वर पाटील, अमोल मासुळे, धीरज परदेशी, विकी परदेशी, भिकन वराडे, प्रशांत बागूल, योगिता बागूल, किरणताई कुलेवार, ऊर्मिला पाटील, आरती पवार, अरुण पवार यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सहभागाने वेधले लक्ष
आज निघालेल्या तिरंगा ध्वज पदयात्रेत शहरातील विविध शाळांतील विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालय, सिंधुरत्न एसव्हीसी महात्माजी इंग्लिश मीडियम स्कूल, न्यू सिटी हायस्कूल, सेंट ॲन्स इंग्लिश मीडियम स्कूल, श्री एकवीरा माध्यमिक विद्यालय, आर. के. चितळे माध्यमिक विद्यालय, मोहंमदिया बॉइज ऊर्दू माध्यमिक विद्यालय, श्री छत्रपती अग्रसेन माध्यमिक विद्यालय, जे. आर. सिटी माध्यमिक विद्यालय, गरुड प्रायमरी स्कूल, परिवर्तन माध्यमिक विद्यालय, अल फातेमा उर्दू हायस्कूल आदी शाळांचा समावेश होता.




