मोटार सायकल व पाण्याची मोटर चोरी करणाऱ्या टोळीला तालुका पोलिसांचा दणका

0

 

मोटार सायकल व पाण्याची मोटर चोरी करणाऱ्या टोळीला तालुका पोलिसांचा दणका

दोन आरोपींना जेरबंद करून मोटरसायकल व पाण्याची मोटर हस्तगत 

जनसंघर्ष न्यूज 

धुळे - तालुक्यातील नेर गावात दिनांक 7 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट रोजी दरम्यान गावातून तक्रारदारा कैलास नाना जाधव रा. नेर ता.जि. धुळे यांनी दिनांक 7ऑगस्ट रोजी रात्री घराच्या अंगणात मोटर सायकल क्रमांक एम.एच 18 पी. 13 76 लावलेली असता तक्रारदार हे  8 ऑगस्ट रोजी सकाळी पाहिले तर चोरट्यांनी मोटरसायकल चोरी झालेली आहे असे लक्षात आले.  

       तक्रारदार यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लागलीच धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे धाव घेत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्या अनुषंगाने तालुका पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 490 / 2025 भारतीय न्याय संहिता कलम 303 (2) प्रमाणे पुण्याची नोंद करण्यात आली होती. त्याचप्रमाणे दिनांक 6 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट रोजी दरम्यान नेर गावातूनच दोन पाण्याच्या मोटरी ( अंदाजे किं.11000 ) देखील चोरी गेल्या बाबत फिर्याद युसुफ सत्तार सैय्यद रा.नेर यांनी त्यांच्या व साक्षीदार नामे सुनंदाबाई सुरेश जाधव रा.नेर यांची घराच्या ओट्यावर लावलेल्या सगुना कंपनीच्या पाण्याच्या मोटरी अज्ञात चोरट्याने चोरी करून घेऊन गेले असल्याची धुळे तालुका पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 497/ 2025 भारतीय न्याय संहिता कलम 303(2) प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. 

    सदर चोरीच्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन धुळे तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी गुन्ह्याच्या तपासाचे सूत्रे हाती घेऊन आपले पथक तयार करून पोहवा. उमेश पवार ,अमोल बोरसे षसंजय जाधव ,दिनेश देवरे , पोशि. देसले व मुंडे यांना गोपी माहिती काढण्याच्या सूचना देऊन मा. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, पोलीस उपअधीक्षक अजय देवरे, अपर पोलीस अधीक्षक उप-विभागीय पोलीस अधिकारी श्री. संजय बांबळे यांचे मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे जलद गतीने फिरवून पारंपारीक व तांत्रीक पध्दतीने गुन्हयांच्या तपासाला गती देवून आरोपी 1) निलेश अभिमन माळी वय 32 2) चंद्रकांत अशोक अहीरे वय 35 दोन्ही रा.नेर ता. जि. धुळे यांस अटक करुन सखोल विचारपूस केली असता नमुद आरोपीने गुन्हयाची कबुली देवून गुन्हयातील चोरलेली मोटर सायकल क्रमांक एम एच 18 पि. 1376 व सगुना कंपनीच्या 2 पाण्याच्या मोटर काढून दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)