राहुलकुमार महिरे यांना महाराष्ट्र शासनाचा ग्रंथमित्र पुरस्कार जाहीर
"ग्रंथालय चळवळीतील योगदानाबद्दल होणार सत्कार"
निजामपूर- महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात येणारा सन्मानाचा आणि प्रतिष्ठेचा असणारा डॉक्टर एस. आर. रंगनाथन (उत्कृष्ट कार्यकर्ता) ग्रंथमित्र पुरस्कार आखाडे ता साक्री जिल्हा धुळे येथील बौध्दवासी शांताई महीरे सार्वजनिक वाचवण्याचे अध्यक्ष अँड: राहुलकुमार महिरे यांना जाहीर करण्यात आला आहे.
शाल,श्रीफळ,सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र,पुस्तक व रोख २५,०००/- असे पुरस्कार चे स्वरूप असून नाशिक विभागातून राहुलकुमार महिरे यांची निवड करण्यात आली आहे. वाचन चळवळ वृध्दिंगत करण्यासाठी व महाराष्ट्रभर चळवळीच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, जीवनमान उंचावण्यासाठी तळागाळापर्यंत वाचून चळवळ पोहोचण्यासाठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाचे योगदान यासाठी ग्रंथालयाचा गुणात्मक विकास व्हावा व ग्रंथालयाकडून राज्यातील जनतेला अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने शासनाकडून दरवर्षी पुरस्काराचे आयोजन केले जाते.
उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावाने पुरस्कार दिले जातात. ग्रंथालय चळवळीतील योगदानाबद्दल कार्यकर्ता व ग्रंथ मित्र पुरस्कार दिला जातो तर, ग्रंथालयातील ग्रंथपाल म्हणून कर्तव्य सेवा बजावत असताना विविध माध्यमातून समाज उपयोगी ज्ञानदानाचे व ज्ञान उपयोगाचे कार्य करणाऱ्यांना ग्रंथालय सेवक पुरस्कार देऊन गौरविण्यात येत असते.
राहुलकुमार महिरे यांनी २००६ मध्ये आपल्या मातोश्रींच्या नावाने आखाडे येथील लहानशा गावात मोफत वाचनालयांची स्थापना केली. त्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना वाचनाची आवड निर्माण करून, विविध वृत्तपत्र, मासिक, साप्ताहिक, पाक्षिक, कथा, कादंबऱ्या, ललित साहित्य अशी विविध प्रकारचे पुस्तक उपलब्ध वाचनालयात उपलब्ध करून दिली.वाचनालयाच्या माध्यमातून ज्ञानदानाचे काम करीत असताना विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम देखील त्यांनी राबविले, वाचन चळवळ फक्त आपल्या गावापुरते मर्यादित न ठेवता नाशिक विभागात जवळपास ३०० पेक्षा जास्त गाव, वस्ती,पाडा,शहर, इत्यादी ठिकाणी नवीन वाचनालय स्थापन करण्यासाठी त्यांचे मोलाचं योगदान आहे. तसेच स्थापन केलेल्या वाचनालयांना मान्यता मिळण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन व सहकार्य केलेले आहे.
ग्रंथालय संघटनेत काम करीत असताना त्यांनी धुळे जिल्हा ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह, नाशिक विभाग ग्रंथालय संघाचे सहकार्यवाह, नाशिक विभाग ग्रंथालय संघाचे संचालक, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे सदस्य अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी राज्य विभाग व जिल्हा स्तरावर गेल्या अनेक वर्षापासून ते पार पडत आहे व कार्यरत आहेत. गाव तिथे ग्रंथालय व्हावे म्हणून ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना ते नेहमी मार्गदर्शन करीत असतात व जास्तीत जास्त गावात मोफत सार्वजनिक वाचनालय स्थापन करण्यासाठी ते प्रयत्नशील असतात.
वाचन चळवळ वृद्धिंगत कशी होईल, वाचनाची आवड विद्यार्थ्यांमध्ये कशी निर्माण होईल यासाठी विविध वृत्तपत्रातून निरंतर लेखन कार्य सुरू असते, सार्वजनिक वाचनालयाचे आद्य प्रवर्तक महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे नावाने देखील त्यांनी पुस्तक प्रकाशित केलेले आहे.
त्याच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना नाशिक विभागातून ग्रंथ मित्र हा सन्मानाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेले आहे. ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, नाशिक विभाग सहायक ग्रंथालय संचालक सचिन झोपुळे, बीड ग्रंथालय अधिकारी संजय मस्के, जालना ग्रंथालय अधिकारी चंद्रशेखर ठाकुर, औरंगाबाद ग्रंथालय अधिकारी सुभाष साबळे, धुळे ग्रंथालय अधिकारी जगदीश पाटील,नंदुरबार ग्रंथालय अधिकारी धरमसिंग वळवी, रायगड ग्रंथालय अधिकारी अजित पवार, धुळे कार्यालय तांत्रिक सहाय्यक आ. झो खंडीकर, मुख्य लिपीक संजय ठाकरे, वरीष्ठ लिपीक एम आर पाटील या अधिकार्यांचेही पुरस्कारासाठी मार्गदर्शन लाभले. त्यांना मिळालेल्या पुरस्काराचे सर्व स्तरातून कौतुक होत असून महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ गजानन कोटेवार वर्धा,राज्य ग्रंथालय संघाचे माजी कार्याध्यक्ष डॉ दत्ता परदेशी कुसुंबा,राज्य ग्रंथालय संघाचे माजी प्रमुख कार्यवाहक अनिल सोनवणे जैताणे,नाशिक विभाग प्रमुख कार्यवाह प्रविण पाटील नंदुरबार, ग्रंथमित्र आर. ओ, पाटील नरडाणा, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अविनाश भदाणे गोंदुर, उपाध्यक्ष महेंद्र जाधव जैताणे, प्रमुख कार्यवाह रोहिदास हाके उडाणे, सहकार्यवाह परमेश्वर महाले वर्षी,जिल्हा कार्यकारीतील संचालक पी. एम. सुर्यवंशी, ही रा चौधरी, भरत रोकडे, हंसराज शिंदे, नरेंद्र महाजन, नरेंद्र देवरे,राजकिरण राजपूत, प्रमोद महाजन,सुरेश मोरे, नानाभाऊ पाटील,ज्ञानेश्वर माळी, एच ए पाटील,राजेश तांदळे, राज देशमुख, युवराज बोरसे, स्नेही परिवारातील अतुल सूर्यवंशी शिरपूर, रवींद्र महिरे,मिलिंद महिरे, सिद्धार्थ महिरे आखाडे, विजया महिरे धुळे,कुणाल सोनवणे नंदुरबार, काशिनाथ ढोढरे, बोरद तळोदा,निरंजन महाजन दोंडाईचा, रविंद्र महिरराव शिरपूर आदींनी अभिनंदन व कौतुक केले आहे

