आनंदा माता यात्रोत्सवानिमित्त निमखेडी गावात रंगली कुस्त्यांची दंगल
जनसंघर्ष न्यूज
धुळे प्रतिनिधी
धुळे तालुक्यातील निमखेडी येथे आदिशक्ती आनंदा माता यात्रोत्सवानिमित्त बुधवारी भव्य कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन गावकऱ्यांतर्फे करण्यात आले होते. कुस्त्यांची सुरुवात सरपंच राजेंद्र सुकलाल पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आली.
पुढील वृत्त असे की, सालाबादप्रमाणे आदिशक्ती आनंदा माता यात्रोत्सवानिमित्त दरवर्षी कुस्त्यांची दंगल घडविण्यासाठी लोकवर्गणी जमा करण्यात येते. तसेच विजेत्या मल्लांना बक्षीस म्हणून भांडे, ढाल, व रोख रक्कम दिली जाते. याच माध्यमातून दि. २० बुधवार रोजी सकाळी 10 वाजता पंचक्रोशीसह विविध गावातून आलेल्या मल्लांच्या कुस्त्या लावण्यात आल्या. या कुस्त्यांची सुरुवात निमखेडी गावाचे सरपंच राजेंद्र सुकलाल पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आल्या. यावेळी अनेक मल्लांनी प्रतिस्पर्धी मल्लाला चितपट करत विजय मिळवला. या कुस्ती दंगलीत धुळे तालुक्यासह, शिरपुर, शिंदखेडा, साक्री, मालेगाव तसेच जळगाव जिल्ह्यातील मल्ल देखील सहभाग घेतला होता. यासोबतच मुलींनी देखील सहभाग घेतला होता..
यावेळी पंच म्हणून छोटू शाह, पिंटू खताळ, रोशन खैरनार, बबलू पाटील, संजय आबा पाटील, बापू मोरे, सुरेश पाटील, गुलाब दादा पाटील, भूषण पाटील, देविदास ठाकरे, संदीप पाटील, महेंद्र पाटील, दत्तू दळवे यांनी भूमिका बजावली.
तसेच यावेळी सरपंच राजेंद्र सुकलाल पाटील, उपसरपंच महेंद्र ठाकरे, भाईदास पाटील, माजी उपसरपंच प्रकाश पाटील, रतिभान पाटील, तुकाराम मोरे, गणपत मोरे, मगण मालचे, पृथ्वीराज पाटील, गुलाब बापू पाटील, विठ्ठल मालचे, बाबूलाल बापू पाटील, मगण बापू खताळ, बाबाजी ठाकरे, सतीश ठाकरे, संतोष मोरे, भूषण पाटील, सखाराम भदाणे, अशोक बापू पाटील, दत्तात्रय पाटील, भाऊसाहेब पाटील, योगेश पाटील, विकास पाटील, भैया पाटील, विनोद बैसाणे, मधुकर ठाकरे, प्रेमराज पाटील, जालम पाटील, जिभो पाटील, चुडामन आण्णा पाटील, ईनुस शाह, रोजगार सेवक हितेंद्र खैरनार, गुटलु भाऊ पाटील, गौरव भदाणे, प्रदीप भाऊ पाटील, निसार शाह, विलास पाटील, विजू नाना पाटील, नगराज पाटील, कुणाल कोळी, राजधर मालचे, मुख्तार शाह, जितेंद्र पाटील, जंगलू ठाकरे, ज्ञानेश्वर भैय्या पाटील, नाना दळवे, अशोक पवार, चुडामन निकम, जिभो काळुंके, गोकुळ ठाकरे, बजरंग वाघ, हासरथ ठाकरे, धनराज माळी, प्रदीप भाऊ पाटील, राहुल पाटील, प्रमोद पाटील, कोमलसिंग मोरे, सर्जेराव पाटील, श्रीराम ठाकरे, भाईदास गायकवाड, रमेश वाघ, प्रमोद राजेंद्र पाटील, भूषण अवचित पाटील आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुस्त्यांची दंगल शांततेत पार पडल्याने निमखेडी ग्रामस्थांनी धुळे तालुका पोलिस प्रशासनाचे आभार मानले..

