स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

0

 

स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर 

जनसंघर्ष न्यूज 

धुळे :- नुकताच स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाची पारोळा रोड येथील हॉटेल मनभवन येथे आढावा बैठक व कार्यकर्ता मेळावा संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली व ज्येष्ठ पदाधिकारी संतोष मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. यावेळी विचार मंचावर प्रदेशाध्यक्ष किरण बागुल , उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष बंडू नाना गांगुर्डे , राज्य समन्वयक विनायक अहिरे , धुळे जिल्हाध्यक्ष विनोद रोकडे , राज्य संघटक देवेंद्र पाटील , जनसंघर्ष न्यूज चे मुख्य संपादक दिनेश निकुंभ आदी मान्यवर उपस्थित होते.

     या कार्यक्रमात अनेक विविध क्षेत्रातील मान्यवरांनी स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाच्या कामावर विश्वास ठेवून पत्रकार संघात प्रवेश केला.

      यावेळी स्वाभिमानी मराठी पत्रकार संघात प्रवेश केलेल्या नवनिर्वाचित मान्यवरांच्या विविध पदांवर नियुक्ती करून त्यांच्यावर पत्रकार संघाची जबाबदारी देण्यात आली. 

      यामध्ये धुळे शहर प्रमुख पदी आसिफ भाई अन्सारी , धुळे जिल्हा उपाध्यक्षपदी राजेंद्र उर्फ अजय भदाणे , धुळे तालुकाध्यक्ष पदी ज्येष्ठ सदस्य टी ए माळी , जळगाव जिल्हाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर सूर्यवंशी , धुळे जिल्हा सहसचिव उपाधी जितेंद्र खैरनार , धुळे शहर उपाध्यक्षपदी विवेक खेळणार यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

       यावेळी स्वाभिमानी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण नेरकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की , आपला पत्रकार संघ हा गेल्या पंधरा वर्षापासून सामाजिक क्षेत्रात व पत्रकारिता क्षेत्रात नेहमी अग्रेसर असतो, आपला पत्रकार संघ हा पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारा संघ असून सामाजिक क्षेत्रात पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असतो व यापुढे देखील संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या जोमाने काम करत राहणार , यानंतर किरण बागुल, संतोष मिस्त्री , विनोद रोकडे यांनी नवीन पदाधिकाऱ्यांना पत्रकार संघाचे ध्येय धोरण समजावून मार्गदर्शन केले.

       यावेळी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आपला परिचय देत आपले मनोगत व्यक्त केले की, स्वाभिमानी मराठी पत्रकार संघामुळे आम्हाला नवीन ओळख मिळाली आहे व आम्हाला दिलेल्या जबाबदारीचे अनेक काटेकोरपणे पालन करून पत्रकार संघाचे काम संपूर्ण महाराष्ट्रात वाढवून संघाच्या वाढीसाठी प्रयत्न करू व पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी नेहमी अग्रेसर असू अशी ग्वाही देण्यात आली. 

        सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवेंद्र पाटील यांनी केले तर कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार माजिद पठाण यांनी मानले .

      सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील विभांडीक , मजहर शेख ,  किशोर सूर्यवंशी , दिनेश निकुंभ प्रकाश लोहार यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)