नांदगाव तालुक्यातील दलित महिलेवर अन्याय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा - महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे

0

नांदगाव तालुक्यातील दलित महिलेवर अन्याय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा - महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे

जनसंघर्ष न्यूज 

नाशिक (प्रतिनिधी) :-  आज दिनांक 7/8/2025 गुरुवार रोजी भिमटोला सामाजिक संघटना यांच्या वतीने नाशिक जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी श्री. बाबासाहेब पारधे यांची भेट घेऊन व नांदगाव तालुक्यातील दलित महिलेवर अन्याय करणाऱ्या वर कारवाई करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे.

     सदर निवेदनात असे म्हटले आहे की मौजे बोलठाण तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथील रहिवाशी सौ.लक्ष्मीबाई एकनाथ गायकवाड यांच्या मालकीचे गट नंबर 310 ही शेतजमीन असून त्यांच्या मालकी हक्काचे दस्त व कागदपत्रे असतानाही तेथील काही गुंड प्रवृत्तीचे लोक जमिनीत येण्यास मज्जाव करून जीवे ठार मारण्याची धमकी देतात यापूर्वी ह्या गावगुंडांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल असूनही ते पीडीतेला मारहाण करून शेतात येण्यास मज्जाव करतात ह्या सर्व गंभीर बाबीकडे सरकारने लक्ष न दिल्यास लवकरच विभागीय महसूल आयुक्त कार्यालया समोर आमरण उपोषण करण्यात येईल..

     याप्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे, प्रदेशाध्यक्ष विकीभाई भोळे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष यशवंत (टिल्लूभाई) साळवे, शहराध्यक्ष विशालभाऊ वाघमारे, महिला आघाडी नेत्या लक्ष्मीबाई गायकवाड, कुणालजी शर्मा, मयूर चव्हाण, युवा नेते प्रशांतजी गांगुर्डे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते..!

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)