सात वर्षे अल्पवयीन आदिवासी मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या भिल समाज विकास मंच संघटनेची मागणी

0

 

सात वर्षे अल्पवयीन आदिवासी मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या 

भिल समाज विकास मंच संघटनेची मागणी 

जनसंघर्ष न्यूज 

   एरंडोल :- दिनांक 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी शिरपूर तालुक्यातील मौजे दहिवद येथे माणुसकीला काळिंबा फासणारी अत्यंत गंभीर आणि अमानवी घटना घडली आहे. या घटनेत एका सात वर्षे अल्पवयीन आदिवासी मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. ही घटना केवळ पीडितेच्या आयुष्यावर परिणाम करणार नाही तर संपूर्ण माणुसकीच्या अस्मितेवर आणि सुरक्षिततेवर आघात करणारी आहे. या घटनेचा बिल समाज विकास मंचच्या माध्यमातून तीव्र निषेध करीत आहोत. 

    सदर पीडित आदिवासी मुलीवर जिल्हा रुग्णालय धुळे येथे उपचार सुरु आहे; आणि सदर मुलगीची परीस्थिती नाजूक आहे. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि संतापाचे

   वातावरण निर्माण झाले आहे. आदिवासी समाज हा शांततामय जीवन जगणारा असून, अशा घटनांनी त्यांच्या मूलभूत हक्कांवर आणि सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.


तरी प्रशासनाने खालील मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. :

१. संबंधित आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत अपहरण व बलात्काराच्या गंभीर कलमांनुसार गुन्हा नोंदवून, SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९, महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ (महाराष्ट्र अमेंडमेंट) ॲक्ट - 2020 व प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्सस्युअल ऑफेन्सस ऍक्ट, २०१२ (पॉक्सो कायदा) अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

२. फास्ट ट्रॅक कोर्टात या प्रकरणाचा खटला चालवावा आणि आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी.

३. आरोपीची २४ तासाच्या आत तात्काळ वैद्यकीय तपासणी करण्यात यावी.

४. पीडित मुलीला तात्काळ वैद्यकीय तपासणी, मानसिक आधार आणि संरक्षण उपलब्ध करून द्यावे.

५. पीडित कुटुंबाला शासनाच्या वतीने आर्थिक मदत व पुनर्वसनाची सुविधा द्यावी.

६. आदिवासी भागात सुरक्षा व्यवस्था वाढवून महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्यात याव्यात.

    सदर मागण्या पूर्ण करून आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी अन्यथा, या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन प्रभावी पावले उचलावीत, जेणेकरून पीडितेला न्याय मिळेल आणि समाजात कायद्याबद्दल विश्वास निर्माण होईल. अन्यथा येत्या काही दिवसात आपल्या कार्यालयासमोर भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भिल समाज विकास मंच संघटनेच्या शिष्टमंडळाने दिला आहे.

     यावेळी निवेदन देताना दिपक दादा अहिरे ( महा राज्य संपर्क प्रमुख तथा जळगाव जिल्हाध्यक्ष ) , सागर भाऊ वाघ ( सोशल मीडिया जिल्हाप्रमुख ), भैय्यासाहेब मोरे ( एरंडोल तालुकाध्यक्ष ) , निहाल सोनवणे ( युवा तालुकाध्यक्ष ) , विष्णू मोरे, लश्मण जावळे , सागर सोनवणे ( गलापुर ) , कैलास मालचे ( पळासदळ ), राजधर मोरे, राहुल मोरे ,हेमराज वाघ, रामदास पवार ,चेतन मोरे, दीपक सूर्यवंशी, हिरालाल सोनवणे, मधुकर सोनवणे ,आबा गायकवाड ,प्रथमेश ब्रिजलाल, शांताराम ठाकरे ,धनराज पवार ,भोला मालचे, विशाल मालचे राहुल मोरे, दादू सोनवणे ,बादल ठाकरे समीर मालचे ,अभय मोरे, सागर अहिरे दीपक सोनवणे ,विजय सोनवणे ,शिवदास सोनवणे, बाबा सोनवणे,  प्रकाश गायकवाड इत्यादी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)