बागल महाविद्यालयात पर्यावरण पूरक गणपती मूर्ती बनवण्याची कार्यशाळा संपन्न

0

 

बागल महाविद्यालयात पर्यावरण पूरक गणपती मूर्ती बनवण्याची कार्यशाळा संपन्न

 जनसंघर्ष न्यूज 

दोंडाईचा:- भारतीय सण, उत्सव व परंपरेला पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने ही महत्व आहे. यामाध्यमातून पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करणे हा ही संदेश दिला जातो. या हेतूने प्रेरित होऊन दिनांक 25 ऑगस्ट रोजी श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या श्रीमती पा बा बागल कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात पर्यावरण पूरक गणपती मूर्ती बनवण्याची कार्यशाळा उत्साहात पार पडली वरील कार्यशाळेत महाविद्यालयातील 60 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला होता. सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहात शाडूच्या मातीपासून पर्यावरण पूरक अशा गणेशमूर्ती तयार केल्या. सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर पी एस लोहार यांनी कार्यशाळेचा उद्देश विषद केला व मुलांना मार्गदर्शक पर्यावरण पूरक गणेशोत्सवाची सध्याच्या काळातील गरज यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नमूद केले की आपण बालवाडीत असताना एक मातीचा कच्चा गोळा असतो आपले शिक्षक त्यावर संस्कार करतात म्हणूनच आपण जानकर व जबाबदार व्यक्ती म्हणून विकसित होतो त्याचप्रमाणे  आजच्या दिवशी तुम्हाला शाडू मातीतून आपल्याला कलागुणांचा वापर करुन गणपती बाप्पा सकारावयाचा आहे. विद्यार्थ्यांनी सकारात्मक राहून आपल्यातला कलाकार जागृत करावा व विलक्षण अनुभूती जपावा असे आव्हान करुन शुभेच्छा दिल्यात.  विद्यार्थ्यांना शाडूच्या माती पासून गणपतीच्या मुर्त्या बनवण्यासाठी श्री आनंद हरी तोरवणे यांनी प्रशिक्षण दिले तर लेफ्टनंट श्री विश्वासराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. परीक्षणानंतर कार्यशाळेत तयार केलेल्या तीन उत्कृष्ट गणरायांच्या मूर्ती बनविणाऱ्या कलाकार विदयार्थ्याना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षीस रोख रक्कम देऊन प्राचार्य प्रा. डॉ. पी एस लोहार यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)