धुळ्यात रविवारी होणार माता माधवी मेगा कॅन्सर-सेमिनारचे भव्य आयोजन

0

 

धुळ्यात रविवारी होणार माता माधवी मेगा कॅन्सर-सेमिनारचे भव्य आयोजन

जनसंघर्ष न्यूज 

धुळे -प्रतिनिधी 

     अग्रवाल विद्यार्थी शिक्षण सहाय्यक मंडळ, धुळे तर्फे रविवार दिनांक २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ ते ६ वाजेपर्यंत अग्रवाल विश्राम भवन, नदी किनारे, धुळे येथे "माता माधवी मेगा कॅन्सर-सेमिनार" आयोजित करण्यात आलेले आहे.या संदर्भात माहिती देण्यासाठी साक्री रोड येथील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघात अग्रवाल विद्यार्थी शिक्षण सहाय्यक मंडळ च्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली होती 

     हया सेमिनार मध्ये मुंबई येथील जसलोक हॉस्पिटलचे सुप्रसिध्द कॅन्सर तज्ञ डॉ. रितु जैन, डॉ. सुनिल चोपडे, डॉ. गौरव ललवाणी, डॉ. प्रविण अग्रवाल, डॉ. शिल्पा अग्रवाल आणि डॉ. आशिष जैन यांचे अमुल्य असे मार्गदर्शन मिळणार आहेत. हया सेमिनार मध्ये प्रामुख्याने महिलांच्या विविध कॅन्सर संबंधित घ्यावयाची काळजी आणि उपाय हयावर मार्गदर्शन करतील आणि तोंडाचे कॅन्सर व सर्वाइकल कॅन्सरच्या व्हॅक्सिनबाबत माहिती देणार आहेत. तसेच रक्तांशी संबंधीत कॅन्सरची घ्यावची काळजी हयावर देखील मार्गदर्शन करतील. तदनंतर डॉक्टरांशी संबंधीत रोगांविषयी प्रश्न-मंजुषा आणि चर्चा करण्यात येणार आहे. सेमिनार पश्चात मंडळाकडून अल्पोपहारची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे.

     तरी धुळयातील जास्तीत जास्त नागरिकांनी हया सेमिनारचा लाभघ्यावा असे आहवान अग्रवाल विद्यार्थी शिक्षण सहाय्यक मंडळ, धुळे यांचे अध्यक्ष, सचिव आणि विश्वस्त मंडळ यांच्या कडून करण्यात आलेले आहे.

     या वेळी पत्रकार परिषदेत अभिषेक अनिल अग्रवाल , गिरीश जुगल किशोर अग्रवाल ,निलेश राधेश्याम गेंदोडिया, सुबोध नारायण अग्रवाल, कौशिक नरेश अग्रवाल, पवन सुभाष अग्रवाल, पवन दीपक अग्रवाल ,स्वपनेश मोदी ,महेश अग्रवाल  , निकुंज. अग्रवाल आदी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)