धुळे शहराची स्वच्छता कशी राखणार ? सर्व 19 प्रभागांची सीमारेषा निश्चित करण्यासंदर्भात शिवसेना महानगर प्रमुख धीरज पाटील यांची एकमेव हरकत
जनसंघर्ष न्यूज
धुळे :- सर्व 19 प्रभागातील चतु :सीमेला जोडणाऱ्या लगतच्या प्रभागाच्या प्रमुख रस्ते, स्थळे यांची हद्द सीमा रेषा एकाच प्रभागत समाविष्ट करणे बाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना महानगर प्रमुख धीरज पाटील यांनी एकमेव हरकत धुळे शहराच्या सार्वजनिक स्वच्छतेबाबत नोंदवलेली आहे. त्यांनी आपल्या या हरकतीत संपूर्ण 19 प्रभागांच्या सीमारेषेवरील रस्त्यांच्या बाबत अभ्यासपूर्ण मांडणी केली असून, प्रभागांच्या सीमारेषे जवळील रस्ते यांची आगामी काळात स्वच्छता कोण करणार हा मोठा प्रश्न या माध्यमातून त्यांनी उपस्थित केला आहे, त्यांनी नोंदवलेल्या हरकतीत म्हटले आहे की महानगरपालिका पंचवार्षिक निवडणूक प्रभाग रचनेवरती हरकत नोंदवताना आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की, धुळे महानगरपालिकेची निवडणूक ही स्थापनेपासून प्रभाग वार पद्धतीने घेण्यात येत आहे, याआधी व आत्ताही येणाऱ्या निवडणुकीत आपण सर्व प्रभागांची त्यातील स्थळे ,महत्त्वाची संकुले, शाळा, महाविद्यालये , प्रभागातील महत्त्वाची प्रतिष्ठाने यांना लागून सर्व प्रभागांची चतु: सीमा निश्चित गुगल मॅप चा वापर करून केली आहे.
गेल्या निवडणुकीत देखील अशाच प्रकारे चतु: सीमा ही ठरविण्यात आली होती. पण बऱ्याच प्रभागा प्रभागाला लागून सीमा रेषे जवळ रस्ते, व इतर सर्व सांकेतिक स्थळे ही त्या प्रभागात समाविष्ट न करता त्यांना सिमेरेषेवरच ठेवण्यात आल्याने अनेक प्रभागातील प्रमुख रस्ते व महत्त्वाची प्रतिष्ठाने हि प्रभागातील नागरिकांनी जनतेने राजकीय पक्षांनी वारंवार सूचित करून देखील विकासापासून दुर्लक्षित राहिली. याचा एक छोटासा उदाहरण द्यायचं म्हटलं अनेक भागातील रस्ते प्रभागाला लागून असल्यामुळे त्या त्या प्रभागातील स्वच्छता निरीक्षक यांनी हा रस्ता आमच्या प्रभागात लगत नसून याची स्वच्छता आम्ही करू शकत नाही, त्यामुळे हे रस्ते महानगरपालिका स्वच्छता विभागाकडून स्वच्छ करण्यास स्वच्छता विभागाच्या निरीक्षकांनी हद्दीचा अहवाला देऊन वेळोवेळी असमर्थता दर्शवलेली आहे हा प्रकार महानगरपालिकेच्या स्थापनेपासून सुरू आहे याची ज्वलंत उदाहरण म्हणजे धुळे शहरातून जाणाऱ्या पांझरा नदीवरील सहा महत्वपूर्ण पुल, हे पूल नेमके कोणत्या प्रभागात येतात हे स्थापनेपासून आजपर्यंत झालेल्या प्रभाग रचनेत त कधीही जाहीर झालेले नाहीत त्यामुळे या पुलांची स्वच्छता करण्यास त्या त्या प्रभागातील स्वच्छता निरीक्षकांनी टाळाटाळ केती आहे, हीच बाब शहरातील महत्त्वाची प्रतिष्ठाने मंदिरे व्यापारी संकुल यांच्याबाबत देखील धुळेकरांना व राजकीय पक्षांना अनुभवायला आलेली आहे, याच अजून एक ज्वलंत उदाहरण म्हणजे संतोषी माता मंदिराकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याकडे जाणारा एसपी ऑफिस लगतचा रस्ता अशी अनेक उदाहरणे वांनगी दाखल आपल्याला दिलेली असून, धुळे शहराचा संपूर्ण प्रभागांचा विचार केल्यास त्यांच्या सीमारेषा पाहिल्यास अनेक महत्वपूर्ण रस्ते, प्रतिष्ठाने ,मंदिरे, रुग्णालये यांचा समावेश हा सीमारेषेवरील रस्त्यावर न ठेवता त्या त्या प्रभागामध्ये त्यांचा समावेश करण्यात यावा जेणेकरून आगामी काळात या संपूर्ण रस्ते असो वा प्रतिष्ठाने यांची साफसफाई संबंधित स्वच्छता विभागाकडून वेळोवेळी करण्यास मदत होईल.
महोदय आपल्याला हा मुद्दा जरी छोटा वाटत असला तरी आपण या संदर्भात स्वच्छता निरीक्षकांशी चर्चा करावी व त्यांना येणाऱ्या अडचणी समजून घ्याव्या जेणेकरून येणाऱ्या काळात धुळे महानगरपालिकेकडून संपूर्ण धुळे शहराची व्यवस्थित साफसफाई होऊ शकेल. याबाबत माननीय निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांना दिनांक 18 सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष हरकतीच्या सुनावणी वेळी उपस्थित राहावे असे सुचित केले आहे. सर्व भावी नगरसेवकांना निवडणूक लढवायची असल्याने त्यांनी प्रभागानबाबत हरकती नोंदवलेल्या असताना धुळे शहराच्या स्वच्छतेच्या संदर्भात एकमेव हरकत शिवसेना महानगर प्रमुख धीरज पाटील यांनी दाखल केल्याने शहराच्या स्वच्छते संदर्भात त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाबाबत सर्वांनी समाधान व्यक्त केले आहे.

