गरबा महोत्सवात महिलांसाठी संस्कृती व स्वसंरक्षणाच्या 5 दिवसीय मोफत कार्यशाळेचे आयोजन

0

 

गरबा महोत्सवात महिलांसाठी संस्कृती व स्वसंरक्षणाच्या 5 दिवसीय मोफत कार्यशाळेचे आयोजन 

गरबा महोत्सव कार्यशाळेत जास्तीत जास्त संख्येने सामील व्हा - ललित माळी 

 केशरानंद मंगल कार्यालय येथे 17 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर पर्यंत भाजपा महानगर तर्फे गरबा महोत्सव 

जनसंघर्ष न्यूज 

      धुळे :-  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा महानगरतर्फे देवपूरातील महर्षी व्यास नगरात धुळे गरबा महोत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. त्यात नवरात्रोत्सवाच्या अंतिम दिवशी एकाचवेळी 5 हजार महिलांचे एकतित्र गरबा नृत्याव्दारे वर्ल्ड रेकॉर्डचा प्रयत्न केला जाणार असून या महोत्सव संस्कृती आणि सुरक्षेचा महासंगम ठरणार आहे. यासाठी उद्या दि.17 पासून  केशरानंद गार्डनमध्ये महिलांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात स्वःसंरक्षणासह गुजरातमधील गरबा नृत्याचे धडे दिले जाणार आहे. या मोफत कार्यशाळेचा लाभ घेण्यासह महोत्सवात महिला भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक भाजपाचे ललित माळी यांनी पत्रकार परिषदेत केले.

       शहरातील साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या पत्रकारपरिषदेला आयोजक ललित माळी, प्रियंका माने, अ‍ॅड.माळी आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना ललित माळी यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा साजरा केला जात असून यानिमित्त देवपूरातील जीटीपी चौकातील महर्षी व्यास नगरात गरबा महोत्सव व महिलांसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या महोत्सवाला आ. अनुप अग्रवाल, जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी आ.कुणाल पाटील यांचे मार्गदर्शन लाभले आहे. आज महिलांच्या सुरक्षेकडे गांर्भीयाने बघण्याची गरज आहे. कारण अनेक वेळेस महिलांची सोनपोत खेचुन नेली जाते, गर्दीच्या ठिकाणी, प्रवास करतांना दागिने चोरी होणे, छेडखानीचेही प्रकार घडतात. त्यामुळेच अशावेळी चार जण मदतीला येतील तोपर्यंत महिला, तरूणींनी स्वतःचे कसे संरक्षण करावे, याबाबत कार्यशाळेत महिलांना स्वसंरक्षणाचे धडे दिले जाणार आहे. याबरोबरच गुजरातमधील गरबा नृत्य, राजस्थानमधील घुमरोचेही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ही कार्यशाळा दि. 17 ते 21 सप्टेंबरदरम्यान देवपूरातील केशरानंद गार्डनमध्ये मोफत आयोजन करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. तर कार्यक्रमाची संकल्पना मांडणार्‍या प्रियंका माने यांनी सांगितले की, नवरात्रोत्सवात अंतिम दिवशी 5 हजार महिलांचा एकत्रित गरबा नृत्य व स्वसंरक्षणाचा संगम होणार असून हा वर्ल्ड रेकॉर्डचा प्रयत्न असेल. या दिवशी स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील राणूबाई भुमिका करणार्‍या अश्विनी महांगडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. तसेच महोत्वात गुजरात, हिंदी व मराठी गायक कलाकारांचा लाईव्ह ऑर्केस्ट्रा होणार असून 500 महिलांना पैठण्यांची खास भेट देण्यात येणार आहे. कार्यशाळेसाठी नोंदणी ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)