महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अंतर्गत 83 गावांची पारोळा तहसील कार्यालयात जनसुनावणी संपन्न

0

 

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अंतर्गत 83 गावांची पारोळा तहसील कार्यालयात जनसुनावणी संपन्न

जनसंघर्ष न्यूज 

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत सन 2024-2025 या आर्थिक वर्षात पारोळा तालुक्यात झालेल्या 83 गावांतील कामांची सामाजिक अंकेशण प्रकिया पूर्ण झाली असून दि.31/08/2025 रविवार रोजी सकाळी ठीक 10 वाजता पारोळा येथील प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात सदर अंकेशण प्रक्रियेची जन सुनावणी पार पडली. यावेळी नागरिकांच्या समस्या समजून घेत त्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले.

      यावेळी आयोजित मगांराग्रारोहयो अंतर्गत घेण्यात आलेल्या जन सुनावणी वेळी अध्यक्ष म्हणून ॲड. राहुल राजेंद्र निकुंभ यांना आमंत्रित केले गेले, यावेळी मा.बीडीओ मोरे साहेब, तहसिलदार देवरे साहेब, डिआरपी शंकर इंगळे साहेब, सामाजिक कार्यकर्ते सतिश संदानशिव, बीआरपी स्वप्निल तायडे, अजय वाघ, भूषण पाटील, अनिश शेख, नवाब तडवी, राहुल रामोशी, अनिल परदेशी, रुपेश पाटील इत्यादी मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले.

       तसेच ॲड.राहुल राजेंद्र निकुंभ यांच्या अध्यक्षतेखाली ही जन सुनावणी पार पडली, यावेळी ॲड.राहुल राजेंद्र निकुंभ यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की शासनाने गोरगरीब जनतेसाठी विविध योजना राबवत असतात पण अजूनही खेड्या गावांमध्ये या योजनेचे महत्त्व नागरिकांना माहीत नसल्याने या योजनेपासून वंचित राहतात. यासाठीच शासनाने गावोगावी जाऊन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी कार्यक्रमाचे नियोजन केलेले आहे. जेणेकरून प्रत्येक गावात शासनाने लागू केलेले योजना लोकांपर्यंत पोहोचवावे व नागरिकांना लाभ घेता यावा यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील असू.

      या वेळी उपस्थित मा. सर्व यंत्रणा/विभाग प्रमुख, ग्रामरोजगार सेवक/ ग्राम पंचायत अधिकारी, कृषी सहाय्यक, वनपाल सर्व, je(सिंचन, बांधकाम), विस्तार अधिकारी (ग्रा.प. व कृषी) APO, TPO, CDEO, RHE इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

         मागील 30 दिवसापासून सामाजिक अंकेशण प्रक्रिया पार पाडण्यात येत आहेत, त्याचा अनुषंगाने पारोळा येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनांची चांगल्याप्रकारे जनजागृती करत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले यामुळे नागरिकांना या योजनांची लोकांना बरीचशी माहिती मिळाली.

         यापुढे देखील गावोगावी जाऊन गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचे महत्त्व सांगून नागरिकांना या योजनेचा लाभ कसा घेता येईल याचे मार्गदर्शन करण्यात येईल असे सांगण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)