"भटके विमुक्त दिनानिमित्त सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग धुळे यांच्या वतीने सांस्कृतिक स्पर्धा कार्यक्रम उत्साहात संपन्न"
शासन निर्णयान्वये ३१ ऑगस्ट हा दिवस भटके विमुक्त दिन म्हणून साजरा करण्याच्या अनुषंगाने धुळे जिल्ह्यामध्ये सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग धुळे यांच्या वतीने भटके विमुक्त दिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे त्याच अनुषंगाने आज रोजी इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अधिनिस्त असलेल्या धुळे जिल्ह्यातील विजाभज प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांकरिता सांस्कृतिक व लोक परंपरा तसेच भटक्या जमाती तील लोकसंस्कृती याबद्दल भागाबाई आनंदा वाघ विजाभज प्राथमिक आश्रम शाळा मोराणे तालुका जिल्हा धुळे येथे सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने सदर कार्यक्रमात धुळे जिल्ह्यातील विविध विजाभज निवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला त्यामध्ये सदर भटक्या जाती जमाती यामधील संस्कृती, लोककला, सांस्कृतिक नृत्य, आणि बोली भाषेतील नाटिका सादर केली. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री महेंद्र चौधरी (निरीक्षक) हे होते तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री शशांक जाधव (निरीक्षक) आणि कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री प्राध्यापक सुदामजी राठोड हे लाभले.
सदर कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्टपणे आपल्या कलागुणांना वाव देत विविध उपक्रम सादर केले. त्याच अनुषंगाने सदर कार्यक्रमांमध्ये महाज्योती संस्थेमार्फत राबविण्यात येणारे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे समग्र वाडमय प्रकाशित करून प्रमुख उपस्थित पाहुण्यांना स्नेहभेट देण्यात आली. यावेळी विजा भज आश्रम शाळेतील सहभागी मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांनी स्वपुर्तीने लक्षणीय सहभाग नोंदविला. सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण धुळे कार्यालयाच्या वतीने राकेश अहिरे व निलेश देवरे हे उपस्थित होते. तसेच सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याकरिता भागाबाई आनंदा वाघ विजाभज आश्रम शाळा मोराणे येथील मुख्याध्यापिका श्रीमती मीना गावित, शिक्षिका श्रीमती अनिता वाघ, तसेच आश्रम शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेऊन कार्यक्रम संपन्न केला.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अनिता वाघ व सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाच्या वतीने राकेश अहिरे यांनी उपस्थित शिक्षक वृंद विद्यार्थी व सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.


