बालाजी रथोत्सवात भक्तांची काळजी घेण्यासाठी एबी फाउंडेशन तर्फे रुग्णवाहिकेची सज्ज

0




आमदार अनुप अग्रवाल यांचे एबी फाउंडेशन घेणार श्री भगवान बालाजी भक्तांची काळजी

रथोत्सवातील मिरवणुकीत डॉक्टरांसह रुग्णवाहिकेची सज्जता 

      धुळे, ता. २७ : घटस्थापनेपासून प्रारंभ झालेल्या येथील श्री बालाजी रथोत्सवांतर्गत गेल्या सहा दिवसांपासून शहरातील विविध भागांतून भगवान श्री बालाजींचे वहन निघत आहे. तब्बल १५० वर्षांची परंपरा असलेल्या या बालाजी रथोत्सवाची विजयदशमीनंतर पाशांकुशा एकादशीला (ता. ३) भव्य मिरवणुकीद्वारे सांगता होईल. या रथोत्सवाच्या मिरवणुकीत श्री बालाजी भक्तांची काळजी घेण्यासाठी शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतील एबी फाउंडेशन सज्ज झाले असून, भक्तांसाठी डॉक्टरांच्या पथकासह रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात येणार आहे.

       एबी फाउंडेशनतर्फे गेल्या वर्षभरापासून विविध गंभीर आजाराच्या रुग्णांना विविध स्तरांवर वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली जात आहे. यामध्ये दुर्धर आजारांचा सामना करणाऱ्या रुग्णांसह अन्य रुग्णांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासह त्यांच्यावर तातडीने उपचार, शस्त्रक्रिया व्हाव्यात म्हणून सर्व प्रकारची मदत दिली जात आहे. तसेच शहरासह परिसरात विविध शिबिरे भरवून रुग्णांना आरोग्य सेवेचा मोफत लाभ दिला जात आहे. यामुळे वर्षभरातच आरोग्याच्या सेवेत एबी फाउंडेशनने शहरवासीयांचा विश्वास संपादन केला आहे. सध्या सर्वत्र नवरात्रोस्वाची धूम सुरू असून, ठिकठिकाणी विविध संस्था, मंडळांतर्फे गरबा, दांडिया खेळण्यासाठी भक्तांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय शहरातील प्रख्यात श्री बालाजी संस्थानतर्फे घटस्थापनेपासून शहरातील विविध मार्गांवरून श्री भगवान बालाजींच्या वहनांची मिरवणूक काढण्यात येत आहे. या बालाजी रथोत्सवाची दसऱ्यानंतर येणाऱ्या पाशांकुशा एकादशीला शहरातील मुख्य मार्गांवरून निघणाऱ्या मिरवणुकीने सांगता होते. या मिरवणुकीत शहरासह परिसरातील विविध गावांतील श्री बालाजी भक्त सहभागी होत असतात. ही रथोत्सवाची मिरवणूक म्हणजे डोळ्यांचे पारणे फेडणारा भव्य आध्यात्मिक उत्सव असतो. या रथोत्सवातील मिरवणुकीत दुर्दैवाने काही दुर्घटना घडली तर आमदार अग्रवाल यांच्या संकल्पनेतील एबी फाउंडेशनतर्फे डॉक्टरांचे पथक तसेच रुग्णवाहिका सज्ज ठेवली जाणार आहे. जेणेकरून संबंधितांना तत्काळ योग्य ते प्राथमिक उपचार मिळण्यास मदत होईल. गरज भासल्यास संबंधितांना तत्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल केले जाईल. 

आजपासून गरबाप्रेमींसाठीही रुग्णवाहिका

सध्या सर्वत्र नवरात्रोत्सवाची धूम सुरू असून, शहरातील विविध भागांतील संस्था, संघटना, मंडळांतर्फे गरबा, दांडिया खेळला जात आहे. यामध्ये त्या-त्या भागातील आबालवृद्ध सहभागी होत आहेत. यामध्ये अनेकदा सतत दांडिया, गरबा खेळल्यामुळे अशक्तपणा जाणवणे, अस्वस्थ वाटणे, ड्रिहायड्रेशन आदी त्रास होत आहे. कधी-कधी हृदयविकाराचा त्रासही जाणवतो आहे. अशांसाठी एबी फाउंडेशनतर्फे आजपासून रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली आहे. ज्यांना काहीही त्रास जाणवला, तर गरबा मंडळांनी अथवा संबंधितांनी एबी फाउंडेशनचे समन्वयक तथा आरोग्यदूत कमलेश देवरे (मोबाईल-80555 56990) यांच्याशी तत्काळ संपर्क साधावा. संपर्कानंतर अवघ्या १० मिनिटांत संबंधित ठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाईल व संबंधितांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले जाईल. नागरिकांनी एबी फाउंडेशनच्या या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. देवरे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)