प्रभाग क्र.7 मधील गुलमोहर हौ.सोसायटीच्या रस्त्यांची समस्या सोडवा अन्यथा महानगरपालिकेला कुलूप लावू - समाधान बैसाणे
गुलमोहर सोसायटीचे नागरिक आक्रमक आयुक्तांना निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा
जनसंघर्ष न्यूज
धुळे :- शहरातील प्रभाग क्र.7 मधील गुलमोहर सोसायटी परिसरात पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पाईपलाईनचे काम सुरू होते. या कामामुळे कॉलनी थोडेफार रस्ते होते त्या रस्त्याची खूप वाईट अवस्था झाली असून गुलमोहर कॉलनी परिसरात अजून पर्यंत रस्त्याचे काम झालेले नाही यामुळे परिसरातील नागरिकांची खूप हाल सहन करावे लागत आहे. तरी देखील महापालिका प्रशासनाला वेळोवेळी सांगून देखील महापालिका आयुक्त व प्रशासक याकडे दुर्लक्ष करीत आहे.
या परिसरात रस्ते नसल्याने रोज अपघात घडत असतात, दोन ते तीन दिवसापूर्वी सकाळी शाळेतील विद्यार्थ्यांची गाडी सुद्धा रस्त्यात फसल्यामुळे खराब झाली होती अशा अनेक समस्यांना रोज सामोरे जावे लागत आहे.
मागील वर्षी देखील पावसाळ्यात स्वतः खासदार आमदार महापालिकेच्या आयुक्त यांनी गुलमोहर हाऊसिंग सोसायटीला भेट देऊन रस्त्यांची पाहणी केली होती. तेव्हा देखील त्यांना स्वतःला रस्त्याने चालताना त्रास सहन करत कॉलनीची पाहणी करावी लागली होती व त्यांनी तेव्हा कॉलनीच्या नागरिकांना आश्वासन दिले होते की लवकरात लवकर तुमच्या रस्त्यांची कामे करून देऊ परंतु अजून देखील पाहणी करून एक वर्ष होऊन देखील काहीही काम होत नाही गुलमोहर कॉलनी परिसराकडे स्थानिक नगरसेवकांचे व प्रशासनाचे दुर्लक्ष केले जात आहे.
गुलमोहर कॉलनी परिसरातील काही ठिकाणी दोन-तीन महिने आधी काँक्रिटीकरण रस्ते झाले आहेत ते देखील दुसऱ्याच पावसात खराब होण्यास सुरुवात झाली असून काँक्रिटीकरण निघत चालले आहे असे निकृष्ट दर्जाचे काम नगरपालिकेचे कंत्राटदार करीत असतात तरी देखील आयुक्त गप्प बसतात कसे काय त्यांच्यावर कारवाई का होत नाही असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
रिपब्लिकन सेना व गुलमोहर हाऊसिंग सोसायटी कॉलनी परिसरातील नागरिकांकडून आयुक्तांना निवेदन देऊन नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सोडवून रस्त्यांची कामे 8 दिवसात नाही सोडवली तर रिपब्लिकन सेनेच्या वतीने गुलमोहर हाउसिंग सोसायटी कॉलनी परिसरातील नागरींकासह मनपाच्या गटाला कुलूप लावून तीव्र स्वरूपाचे ओळख केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी रिपब्लिकन सेनेचे धुळे जिल्हाध्यक्ष समाधान बैसाणे , पै. मुकेश खरात, महिला जिल्हाध्यक्ष कविता पाटील, महिला जिल्हाध्यक्ष संजना अहिरे , महिला शहराध्यक्ष अश्विनी गवळी, चेतन भदाणे, नरेंद्र बिलाडे, कुलदीप सोनवणे, क्रिष्णा मोरे , शुभम पाटील, नम्रता अहिरराव, नीता मोरे, उर्मिला भदाणे , वंदना भदाणे , प्रतिभा सोनवणे , योगिता पाटील, मीना पाटील, प्रियंका पाटील, अल्का भदाणे, मंगला पाटील, कुसुंबा महाले, श्वेता नेरकर, सविता देवरे, जयश्री सूर्यवंशी इत्यादी उपस्थित होते.

