जिल्हा शल्यचिकित्सक व अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जिल्हा रुग्णालयाच्या बाह्य स्वच्छतेबाबत घेराव
बाह्य आवाराची स्वच्छता, रुग्णांना बसायला बाकडे, पार्किंगची व्यवस्था पूर्ण न केल्यास आरोग्यमंत्र्यांना उद्घाटन करू देणार नाही :- शिवसेनेचा इशारा
जनसंघर्ष न्यूज
धुळे - शिवसेना उबाठा वतीने गेल्या महिन्याभरापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता आर आर पाटील यांना जिल्हा रुग्णालयातील ड्रेनेजच्या संदर्भात जिल्हा रुग्णालयात पुराचे पाणी साठत असल्याबद्दल निवेदन देऊन लवकरात लवकर कार्यवाही करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले होते, जिल्हा रुग्णालयातील त्यातलाच उद्घाटन येत्या चार दिवसानंतर राज्याचे आरोग्य मंत्री यांच्या हस्ते होणार असून अद्यापही जिल्हा रुग्णालयाच्या बाह्य आवारात प्रचंड कचरा काटेरी झुडपे तसेच ड्रेनेजचे पाणी गटारांच्या स्वरूपात वाहत असून जिल्हा रुग्णालयाच्या अपघात विभागात च्या बाजूने येणारा नाला याची स्वच्छता न झाल्याने हे पाणी संपूर्ण जिल्हा रुग्णालयाच्या आवारात साठत असून गेल्या दोन दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयाचे अपघात विभाग तसेच सर्व सामान्य रुग्णालयात देखील शिरले होते यासंदर्भात शिवसेनेने जिल्हा शल्य चिकित्सक यांची वेळोवेळी भेट घेऊन या संदर्भात उपाययोजना करण्याचे आव्हान केले होते परंतु जिल्हा शल्यचिकित्सक व अधीक्षक अभियंता बांधकाम विभाग यांच्यात या कामावरून बेबनाव असल्याने जिल्हा रुग्णालयाच्या अंतर्गत महिला रुग्णालय किंवा कॅथलब व आतील इन्फ्रास्ट्रक्चर संदर्भात उपायोजना झाल्या असताना देखील रुग्णांना या रुग्णालयात आपला ऋण दाखल करताना असंख्य समस्यांना सामोरे जावे लागत होते, याबाबतीत जिल्हा रुग्णालयाच्या कॅथ लॅबचे उद्घाटन आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते होत असताना जिल्हा रुग्णालयाच्या बाह्य समस्येबाबत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक पवित्रा घेत धुळे महानगरपालिका स्वच्छता विभागाचे अधिकारी तसेच जिल्हा शल्य चिकित्सक तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांना घेराव टाकून यासंदर्भात उपाय योजना करण्याचे आवाहन केले या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग व तसेच जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यातील बेवनाव स्पष्टपणे दिसून आला, जिल्हा रुग्णालयातून जाणाऱ्या नाल्याची सफाई तसेचअंतर्गत विभागाची सफाई याचे काम पूर्णपणे महानगरपालिका स्वच्छता विभागाचे असून त्या संदर्भात महा नगरपालिका आयुक्तांशी देखील संपर्क साधून युद्ध पातळीवर या आवारात स्वच्छता करण्याचे आश्वासन जिल्हा शल्य चिकित्सक व अधीक्षक अभियंता यांनी यावेळी दिले, या आवाराची स्वच्छता तसेच रुग्णांना सुविधा उपलब्ध न करून दिल्यास आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कॅथ लॅबचे उद्घाटन प्रसंगी आरोग्यमंत्र्यांना घेराव टाकण्याचा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी, शिवसेनेचे अतुल सोनवणे, नरेंद्र परदेशी, धीरज पाटील, भरत मोरे, सुनील पाटील, प्रशांत भामरे, निंबा मराठे, शिवाजी शिरसाळे, कपिल लिंगायत, पिनु सूर्यवंशी, निलेश कांजरेकर, ज्योती चौधरी, विष्णू जावडेकर योगेश पाटील, नासिर पिंजारी, वैभव पाटील, तेजस सपकाळ आदी उपस्थित होते.


