ना. जयकुमार रावल यांचे ओएसडी म्हणून नरेंद्र उर्फ बंडूनाना कुलकर्णी यांचे नियुक्ती
जनसंघर्ष न्यूज
धुळे - धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल आमचे ओएसडी म्हणून पोलीस खात्यातील प्रसिद्ध कर्तव्य अध्यक्ष अधिकारी नरेंद्र उर्फ बंडू नाना कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बंडू नाना कुलकर्णी हे संपूर्ण धुळे जिल्ह्यात एक आदर्श प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. याआधी देखील बंडू नाना आहे बंडू नाना ना. जयकुमार रावल त्यांचे ओएसडी होते. त्यानंतर ना. अब्दुल सत्तार यांचे ओळखते म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती.
बंडू नाना कुलकर्णी यांनी त्यांच्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत असल्याने त्यांना मंत्र्यांचे विशेष कर्तव्य अधिकारी म्हणून चांगला अनुभव असल्याने, त्यांचा मनमिळावू स्वभाव असल्याने त्यांच्या ओळखींचा सदुपयोग करून सर्वांना सोबत घेऊन व गरजवंतांना मदत करत असतात.
ना. जयकुमार रावल यांचे ओएसडी म्हणून बंडू नाना कुलकर्णी यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या हितचिंतकांकडून मोठा आनंद व्यक्त केला जात आहे. त्यांच्या नियुक्ती बद्दल धुळे जिल्ह्यासह संपूर्ण खानदेशात आनंदाचे वातावरण झाले आहे व त्यांच्यावर शुभेच्छांचे वर्षाव होत आहे.

