सामाजिक कार्यकर्त्याला शिविगाळ , दमदाटी करणाऱ्या पोलिसांना मानव अधिकार आयोगाचा दणका
शिवीगाळ, दमदाटी करणाऱ्या दोघा पोलिसांच्या चौकशीचे मानवाधिकार आयोगाचे आदेश - रफिक शाह
जनसंघर्ष न्यूज
धुळे :- शहरातील चाळीसगाव रोड पोलिस स्टेशनमधील कॉन्स्टेबल स्वप्नील बाबुराव सोनवणे व इंद्रजित ईश्वर बैराट यांनी केलेल्या गैरवर्तनाची तक्रार महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग मुंबई यांच्याकडे करण्यात आली होती. तसेच तक्रारदाराला त्याच्या मानवी हक्कांच्या उल्लंघनासाठी भरपाई म्हणून, आदेश मिळाल्यापासून ८ आठवड्यांच्या आत राज्य सरकारकडून २०,०००/- रुपये दिले जातात. जर ते पूर्ण झाले नाही तर राज्य सरकार रक्कम अंतिमपणे मिळेपर्यंत वार्षिक ७ टक्के दराने साधे व्याज देईल. या दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तनाची विभागीय चौकशी करण्याचे आणि त्यांच्यावर आवश्यक ती शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश दिले अशी माहिती रफिकशाह गुलाब शाह यांनी पत्रकार परिषदेत दिली. साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या भवनात आयोजित पत्रकार परिषदेत तक्रादार रफिक शाह गुलाब शाह यांनी माहिती देताना सांगितले कि, चाळीसगाव रोड पोलिस स्टेशन येथे दि.२९/१/२०२४ रोजी पोलीस स्टेशनला गेलो असतो शाहरूख शेख या इसमाची अशोक लेलंड गाडी स्क्रॅप ऑईल सोबत सदर पोलीसांनी जमा केलेली होती. २० हजार देतील तरच गाडी सोडू. मी त्यांना सांगीतले पैसे देणार नाही. संबंधितांना मी बिल वगैरे दाखवले. गयावया केली. त्यांनी २० हजार रूपयांची लाचेची मागणी गाडी वाल्याकडे केली. तसेच मला अरेरावीची भाषा करून दमदाटी केली. शिवीगाळ केली. माझ्या विरुध्द अँटासिटीचा गुन्हा दाखल करू अशी धमकी दिली. पोलिसांचे सर्व कृत्य व्हिडीओ शुटींगद्वारे उपलब्ध आहे. त्यामुळे गैरवर्तनाची तक्रार महराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग मुंबई यांच्या कडे केली होती. तरी त्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन व्हावे अशी देखील मागणी तक्रारदार याने केली आहे.

