शिंदखेडा तालुक्यात अचानक पावसासह वादळी वाऱ्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
तापी परिसरातील, शेतकरी बांधवांच्या पिकांचे नुकसान
जनसंघर्ष न्यूज
शिंदखेडा :- तालुक्यातील कळगाव कुंभारे येथील रावसाहेब विक्रमसिंग गिरासे, व कुंभारे येथील शेतकरी ज्ञानेश्वर अंबरसिंग गिरासे,गट नंबर 131/1,2. गोविंदसिंह पौलतसिंग गिरासे, ज्ञानेश्वर भास्कर पाटील या शेतकऱ्यांचे केळीचे,नुकसान झाले आहे,कुंभारे,कळगाव लोहगाव वसमाने व इतर तापी परिसरात कापूस,ऊस, मका,पपई,व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच, लोहगावातील शेतकरी चंद्रकांत पाटील यांच्या शेतातील केळी च्या बाग जमिन दोष झाला आहे .वसमाणे ,रंजाने,जसाने रंजाणे अच्छी असे,असे अनेक तापी परिसरातील अनेक गावात शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले,ऊस, पपई, कपाशी,केळी मिरची रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान प्रशासन तात्काळ दखल घेऊन शेतकरी बांधवांच्या पिकांचे नुकसान भरपाई जाहिर करावी असे तापी परिसरातील शेतकरी बांधवांची मागणी आहे.

