दोंडाईचा शहरात हजरत मोहम्मद पैगम्बर जयंती उत्साहात व सलोख्यात पार पडली

0



दोंडाईचा शहरात हजरत मोहम्मद पैगम्बर जयंती उत्साहात व सलोख्यात पार पडली

जनसंघर्ष न्यूज 

दोंडाईचा - प्रेषित हजरत मोहम्मद पैगम्बर ( स्व.अ.व ) यांच्या १५००वी जयंतीनिमित्त आज शहरात (जुलुस ) रॅली चे आयोजन करण्यात आले होते।अध्यक्षस्थानी  हजरत मुफ्ती अहेमद रज़ा साहेब  होते

रॅली चे शुभारंभ धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते करण्यात आले। अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, सोबत नुराणी मस्जिद चे मौलाना हजरत जियाऊद्दीन साहेब, गौसिया मस्जिद चे मौलाना हजरत मुशाहिद रज़ा, मोहम्मदीया मस्जिद चे मौलाना हामिद रज़ा, हुसैनिया मस्जिद चे मौलाना जाविद रज़ा, गरीब नवाज मस्जिद चे मौलाना , आयेशा मस्जिद चे मौलाना मुकर्रम साहेब, मदिना मस्जिद चे मौलाना शाहिद रजा,गरीब नवाज मस्जिद चे

मौलाना कासिम साहब

 मौलाना ,रज़ा मस्जिद चे मौलाना हे उपस्थितीत  होते . रॅली ला संबोधित करतानां पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी प्रेषित हजरत मोहम्मद नावाचा अर्थ म्हणजे ज्याची खूप स्तुती झाली असे आहे  म्हणजे त्यांच्या दयाळूपणा, करुणा, संयम , मानवतावादी दृष्टिकोन , शांतता , देशप्रेम आणि नेतृत्व क्षमता यासारख्या असाधारण गुणांची स्तुती केली  ते इस्लामचे संस्थापक आणि अल्लाहचे शेवटचे प्रेषित होते ज्यांनी कुराणचा उपदेश केला आणि सर्व मानवजातीसाठी आदर्श जीवन जगून लोकांसमोर एक आदर्श उदाहरण निर्माण केले .त्यांचे अनुयायी त्यांच्या शिकवणींचे पालन करतात आणि त्यांना सर्व प्रेषितांमध्ये सर्वश्रेष्ठ मानले जातात असे सांगितले . 

 पैगंबर जयंती निमित्त मुस्लिम समाजातील तरूणांना  आव्हान केले की रॅलीत पैगंबर साहेबांच्या आत्म्याला त्रास होईल त्यांच्या  शिकवणींना धक्का पोहचेल असे कोणतेही कृत्य करायला नको .  आजची रॅली ज्या प्रमाणे शिस्तबद्ध, शांततापूर्ण निघाली ही  येणाऱ्या दहा वर्षा पर्यंत लक्षात ठेवल जाईल, शेवटी शुभेच्छा देऊन झेंडा दाखवून पोलीस अधीक्षक श्रीकांत यांनी रॅली (जुलुस )चे शुभारंभ करून सुरुवात 

  जामा मस्जिद एकता चौक येथुन  करण्यात आली  जामा मस्जिद, भोगावती नदीच्या पुलावरून , शनिमंदिर, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पासुन,  अभिषेक चित्र मंदिर, होळी चौक, राणिपुरा, आझाद चौक, गुरव स्टॉप, अमरावती नदी मार्ग,  नुराणी मस्जिद, अब्दुल हमीद चौक, ग्यानचंद मेडिकल, शामसुंदर प्रोविजन, बैंक ऑफ महाराष्ट्र, तेथून दादासाहेब रावल बैंक,परत नुरानी मस्जिद, अमरावती नदि पात्र, रावल गढी, जामा मस्जिद येथे समारोप करण्यात आले ।

 हजरत मोहम्मद पैगम्बर जयंती निमित्त महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी मुस्लिम समाजाला शुभेच्छा दिल्या त्यांचा सोबत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे,गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, तहसीलदार संभाजी पाटील, मुख्याधिकारी देवेंद्र परदेशी, माजी नगराध्यक्ष रविंद्र देशमुख, माजी उपनगराध्यक्ष नबु पिंजारी , जामा मस्जिद चे चेअरमन सूलतान पिंजारी ,  माजी उप नगराध्यक्ष दिनेश चोळके, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अल्पसंख्यांक विभागाचे  जिल्हाध्यक्ष नाजीम शेख, भाजपा शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे मा,नगरसेवक प्रविण महाजन, विजय मराठे, निखिल राजपुत, रविंद्र जाधव ,नरेंद्र गिरासे, छोटु मराठे,नरू कोळी, भुपेंद्र धनगर, कृष्णा नगराळे, हाजी गफ्फार मंसुरी, जामा मस्जिद चे ट्रस्टी मुश्ताक खाँसाहेब, हाजी सिराजुद्दीन, हाजी वाहीद,समशोद्दीन शेख, असलम गुलाब बागवान, जलील बागवान, मोहसिन सिराजुद्दीन शेख,शफिक काझि,  जलील मन्यार, गुलाब मन्यार, युनुस खान, फारूक मुनिर ,अश्पाक मन्यार, शब्बीर बेग,मोहसिन खान हमीदखान, रफिक शाह ,आजी माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते,  मुस्लिम समाजातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते रॅली (जुलुस) शांततेत पार पाडण्यात दोंडाईचा शहराचे पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे,  सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा पारधी , पोलीस उप निरीक्षक शिंपी , पोलीस उप निरीक्षक निलेश मोरे पी एस आय कुमावत, गोपनिय विभागाचे अविनाश पाटील, धुळे जिल्ह्यातील व दोंडाईचा  पोलीस स्टेशन चे सर्व पोलीस कॉन्स्टेबल यांनी चोख बंदोबस्त केला सदर रॅली जुलुस  चे आयोजन जामा मस्जिद चे चेअरमन सूलतान  मंसुरी व दोंडाईचा शहरातील सर्व मस्जिद चे ट्रस्टी यांनी एकत्र मिळून केले होते .

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)