शिंदखेडा तालुक्यातील मौजे विखुर्ले गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेचे आदर्श शिक्षक राहुल पाटील सर यांच्या निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न
जनसंघर्ष न्यूज
जिल्हा परिषद मराठी शाळा विखुर्ले येथे गेल्या सहा ते सात वर्षांपासून शाळेत कार्यरत असलेले उपशिक्षक राहुल पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण, क्रिडा, स्पर्धा, संस्कृती प्रत्येक महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी, स्वातंत्र्य दिवस, प्रजासत्ताक दिवस, संविधान दिवस, मराठी, इंग्रजी, हिंदी, गणित, बुध्दीमत्ता कौशल्य असे अनेक विषयांवर शिक्षणाची कास धरून विद्यार्थी बालमित्र घडवले. आदर्श शिक्षक राहुल पाटील सर यांची बदली झाल्याबद्दल ग्रामपंचायत विखुर्ले सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या कडुन निरोप समारंभ व सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विखुर्ले गावातील माजी सरपंच गुलाबराव संभाजी पाटील आणि ग्रामपंचायत विखुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित निरोप समारंभ कार्यक्रम गावातील समस्त ग्रामस्थ, युवक, माता पालक, शेकडोच्या संख्येने उपस्थित होते. निरोप समारंभ च्या कार्यक्रमानिमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती शिंदखेडा माजी सभापती जिजाबराव पाटील, पोलीस पाटील संघाचे धुळे जिल्हा अध्यक्ष प्रकाश पाटील, विखरण गावाचे सरपंच, महेंद्र पवार,कामपुर गावाचे सरपंच विष्णू पाटील, जोगशेलू गावाचे सरपंच नितिनदादा देसले, रहिमपुरे गावाचे सरपंच अरुण जी पाटील, जोगशेलु गावाचे उपसरपंच किरण दादा आणि ज्यांच्या कडून शाळेसाठी पेंट खरेदी करून शाळा रंगीबेरंगी केली असे कृष्णा पेंट चे संचालक पंकज गिरासे, शुभम हार्डवेअर चे मालक देवेंद्र भाऊ गिरासे, विखुर्ले गावाचे सरपंच जन्याबाई भिल, उपसरपंच जगन्नाथ बापु केदार, सोनशेलु गावाचे माजी उपसरपंच राहुल गिरासे, विखुर्ले गावाचे माजी सरपंच जगदिश तिरमले (पिंटूशेठ), महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक विद्यालय विखुर्ले च्या मुख्याध्यापिका रेखा पाडवी मॅडम व विलास पाटील सर व सर्व शिक्षक विखुर्ले गावाच्या ग्रामसेविका रोहीणी पवार, तलाठी, स्नेहल पाटील, जिल्हा परिषद मराठी शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र चौधरी सर यांची कार्यक्रमासाठी उपस्थिती लाभली.
विखुर्ले गावचे माजी सरपंच श्री गुलाबराव पाटील यांनी शाळेतील शिक्षकांनी मागील सहा वर्षात केलेल्या धडाडीच्या कामांचा पाढाच वाचला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री जिजाबराव पाटील यांनी अशी शाळा आणि असे शिक्षक मी माझ्या 40 वर्षांच्या राजकीय कालखंडात पहिल्यांदा बघितले, असे प्रतिपादन केले. आलेल्या पाहुण्यांनी शाळेचे बदलेले रूप पाहून गौरवोद्गार काढले. शाळेचे मुख्याध्यापक श्री रविंद्र चौधरी सर आणि श्री राहुल पाटील सर यांनी मिळून शाळे च्या गुणवत्तेत आणि भौतिकतेत जे बदल केले त्याबद्दल गावकऱ्यांनी जाहीर आभार मानले. चौधरी सर शाळेचे सरसेनापती होते म्हणून माझ्या सारखा मावळा इथे काम करू शकला असे प्रतिपादन श्री राहुल पाटील सर यांनी त्यांच्या भाषण केले. त्यांनी आपल्या भाषणात समस्त ग्रामपंचायत टीम, गावकऱ्यांचे व पालकांचे मनापासून आभार मानत असताना विखुर्लेकरांची आठवण कायम मनात राहील, असे भावनिक शब्दोद्गार काढले. रामनगर शाळेचे मुख्याध्यापक श्री ईश्वर वाघ सर व सहशिक्षक प्रवीण पाटील सर यांनी चौधरी सर्व पाटील सर यांचा सत्कार केला त्याचबरोबर देगाव शाळेचे मुख्याध्यापक तथा शिंदखेडा चे केंद्रप्रमुख श्री शिंदे सर आणि सहशिक्षक श्री राकेश बागुल सर यांनी शाळेच्या दोन्ही शिक्षकांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
श्री राहुल पाटील सर यांच्या बदलीमुळे शाळेचेच नव्हे तर संपुर्ण विखुर्ले गावचे वातावरण सुन्न झाले होते. गावकरी, मुले, मातापालक तहानभूक विसरून कार्यक्रम स्थळी रडत होते. सर्वांनी साश्रु नयनांनी राहुल पाटील सरांना निरोप दिला.

