श्री छत्रपती अग्रसेन महाराजांच्या जयंतीनिमित्त सोमवारी पुतळा पूजन, बाइक रॅली, शोभायात्रा

0




श्री छत्रपती अग्रसेन महाराजांच्या जयंतीनिमित्त सोमवारी पुतळा पूजन, बाइक रॅली, शोभायात्रा

अग्रवाल समाजातर्फे रक्तदान शिबिरासह विविध कार्यक्रम

जनसंघर्ष न्यूज 

धुळे, ता. २० : सूर्यवंशी अग्रवंश शिरोमणी श्री छत्रपती अग्रसेन महाराजांच्या जयंती उत्सवानिमित्त शहरातील अग्रवाल समाजातर्फे समाजबांधवांसाठी १३ सप्टेंबरपासून विविध कार्यक्रम, उपक्रम होत आहेत. याअंतर्गत सोमवारी (ता. २२) श्री छत्रपती अग्रसेन महाराजांच्या जयंतीचा मुख्य कार्यक्रम होईल. यात अग्रसेन चौकात पुतळा पूजन, बाइक रॅली, शोभायात्रा, रक्तदान शिबिर, पारितोषिक वितरण आदींचा समावेशआहे.

श्री छत्रपती अग्रसेन महाराज जयंती उत्सवानिमित्त शहरातील अग्रवाल समाजातर्फे दर वर्षी विविध कार्यक्रम होतात. यावर्षीही समाजातर्फे अग्रवाल महिला व युवती मंडळ, अग्रवाल युवक मंडळातर्फे १३ सप्टेंबरपासून समाजबांधवांसाठी विविध वयोगटांत क्रीडा स्पर्धा, हस्तकौशल्य, पाककला, सांस्कृतिक आदी कार्यक्रम, उपक्रम झाले. श्री छत्रपती अग्रसेन महाराज जयंतीचा सोमवारी (ता. २२) मुख्य कार्यक्रम होईल. शहराचे आमदार अनुप अग्रवाल प्रमुख पाहुणे असतील. युवा उद्योजक अजय अग्रवाल अध्यक्षस्थानी असतील. सोमवारी सकाळी नऊला मालेगाव रोडवरील अग्रसेन चौकात अग्रसेन महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून ध्वजवंदन होईल. यानंतर समाजबांधवांच्या उपस्थितीत बाइक रॅली काढण्यात येईल. सकाळी अकराला अग्रवाल विश्राम भवनात रक्तदान शिबिर होईल. दुपारी चारला अग्रसेन चौकातील अग्रसेन महाराज स्मारकापासून भव्य शोभायात्रा काढण्यात येईल. सायंकाळी सातला विविध स्पर्धांमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण व सुरूची भोजनाचा कार्यक्रम होईल.

या सर्व कार्यक्रमांत समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समाजाचे अध्यक्ष डॉ. जगदीश गिंदोडिया, अग्रवाल विद्यार्थी शिक्षण सहाय्यक मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश अग्रवाल, विनोद अग्रवाल, शशिकांत अग्रवाल, उपाध्यक्ष अजय अग्रवाल, सचिव सुनील अग्रवाल, गणेश अग्रवाल, सुनील सिंघानिया, सहसचिव संजय गिंदोडिया, भवन निरीक्षक कैलास अग्रवाल, खजिनदार अनिल अग्रवाल, महिला मंडळाच्या अध्यक्षा भारती सिंघानिया, युवक मंडळाचे अध्यक्ष सौरभ गिंदोडिया, युवती मंडळाच्या अध्यक्षा श्रेया अग्रवाल, अग्रवाल सहाय्यक मंडळाचे अध्यक्ष कैलास अग्रवाल, समाजाचे वैद्यकीय सेलचे अध्यक्ष डॉ. दिनेश अग्रवाल यांनी केले. युवक मंडळाचे अध्यक्ष सौरभ गिंदोडिया आदींनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)