त्र्यंबकेश्वर येथील पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ तर्फे जाहीर निषेध
जनसंघर्ष न्यूज
धुळे :- नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे वृत्तांकनासाठी जात असलेल्या पत्रकारांना स्वामी समर्थ केंद्र जवळ असलेल्या पार्किंगवरील गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांकडून नाशिक येथील इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींना बेदम मारहाण करून दिवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे.
सदर हल्ल्यात ज्येष्ठ पत्रकार योगेश खरे, अभिजीत सोनवणे, किरण ताजणे हे गंभीर जखमी झाले असून त्यातील पत्रकार किरण ताजणे यांचे प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
माननीय मुख्यमंत्री साहेबांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मारहाण करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या हल्लेखोरांचे रेकॉर्ड चेक करून त्यांच्यावर मोक्कासह पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी धुळे यांच्याकडे करत धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाने निषेध व्यक्त केला आहे.
यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे , उपाध्यक्ष अतुल पाटील, सचिव सचिन बागुल, कोषाध्यक्ष तुषार बाफना, मुंबई प्रांतिक प्रतिनिधी प्रकाश शिरसाठ, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र सोनार, मिलिंद बैसाणे दै. महाराष्ट्र शोधयात्रा, चंद्रशेखर पाटील मी महाराष्ट्र न्यूज चैनल, सुनील पाटील दै.आपलं नवराज्य , प्रशांत परदेशी झी २४ तास, रवी नगराळे श्रीराम टीव्ही, मनीष मासुळे TV9, पंकज पाटील दै. स्वतंत्र भारत, दीपक वाघ राज्यकारभार न्यूज , वीरेंद्र मोरे, साहेबराव बंण्डल, पंकज पाटील महाराष्ट्र टाइम्स, संदीप त्रिभुवन, देवेंद्र पाटील दै. स्वराज्य लक्ष्य, जीवन आबा शेंडगे, पुरुषोत्तम पाटील, संजय पाटील, गोरख गर्दे ,दीपक बोरसे, सय्यद मुदत शेख अली, रूपक बिरारी , निलेश भंडारी ,कमलेश पाठक, सय्यद सानिल दै. महाराष्ट्र निरीक्षण, संदेश अहिरे, आनीस खाटीक, पारित अन्सारी, दिपक शिंदे , आकाश सोनवणे, निलेश परदेशी, गणेश सूर्यवंशी , जमील शाह, सुभाष वाघ आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.

