राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा - महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे
जनसंघर्ष न्यूज
नाशिक - (प्रतिनिधी), दि. 17 सप्टेंबर रोजी भिमटोला सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक विभागाचे महसूल उपायुक्त श्री. लोखंडे यांची भेट घेऊन वरील विषयाचे निवेदन देण्यात आले.
निवेदनाचा आशय असा आहे की ह्यावर्षी राज्यात तसेच देशात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे..
पिके जमीन दोस्त झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे सरकारने त्वरित राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांचे सर्व प्रकारचे कर्ज माफ करावे तसेच पावसामुळे मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अन्यथा जन आंदोलन छेडण्यात येईल.
याप्रसंगी भिमटोला सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे, भारतीय बहुजन सेनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांतजी घोडेराव, एडवोकेट उमेशजी भाबड, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर बहाळकर, शहराध्यक्ष मुकुंदजी काळे, रिपाई जिल्हा नेते भास्करजी साळवे, शिवसेना नेते सागरभाऊ मोरे, तालुका नेते संजय नाना गांगुर्डे, मधुसूदन धोंगडे, युवा नेते प्रशांत गांगुर्डे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते..!

