नक्षलवादविरोधी जनसुरक्षा विधेयकाच्या समर्थनार्थ विविध संघटनांची धुळ्यात सभा

0

धुळे : नक्षलविरोधी जनसुरक्षा विधेयक समर्थन समितीतर्फे पारोळा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ झालेल्या सभेवेळी विधेयकाच्या समर्थनार्थ  विविध घोषणा देताना विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी.

नक्षलवादविरोधी जनसुरक्षा विधेयकाच्या
समर्थनार्थ विविध संघटनांची धुळ्यात सभा

जनसंघर्ष न्यूज 

धुळे, ता. २७ : नक्षलवादी आणि माओवादी विचारसरणीच्या विध्वंसक प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने विधिमंडळात मंजूर केलेल्या महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक २०२४ च्या समर्थनार्थ धुळे शहरातील विविध संघटनांचतर्फे समर्थन सभा नुकतीच झाली. नक्षलविरोधी जनसुरक्षा विधेयक समर्थन समितीतर्फे झालेल्या या सभेत सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, कामगार, विविध संघटनांचे प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

विवेक विचार मंचचे राज्य संयोजक सागर शिंदे यांनी सभेला संबोधित करताना म्हटले, की शहरी नक्षलवादी चळवळी या संविधानविरोधी असून, लोकशाही व्यवस्थेच्या विरोधात सातत्याने जहाल विचार पेरण्याचे काम करत आल्या आहेत. या फुटीरतावादी संघटनांना कायमस्वरूपी प्रभावी प्रतिबंध करण्यासाठी जनसुरक्षा कायद्याची आवश्यकता आहे. हा कायदा संविधानिक असूनही कम्युनिस्ट संघटना यास विरोध करत समाजामध्ये गैरसमज पसरवत आहेत. 

अखिल भारतीय वाल्मीकी महासभेचे प्रदेशाध्यक्ष नागेज कंडारे यांनी प्रास्ताविक केले. समर्थन सभेला विवेक विचार मंचचे विभाग संयोजक जयेश चौधरी, उमेश चौधरी, भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, ज्येष्ठ नेते विजय पाच्छापूरकर, हिरामण गवळी, माजी महापौर प्रदीप कर्पे, प्रतिभा चौधरी, महेश मिस्तरी, भाजप कामगार मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विजय पवार, शिवाजी काकडे, भाजपचे कमलाकर पाटील, उमेश चौधरी, रोहित चांदोडे, अमित पवार, पप्पू डापसे, जयेश मगर, जयंत वानखेडकर, अनिल थोरात, रूपाली पाटील, सुचेता शिनकर, राजेश वाणी, महेंद्र विसपुते, काशिनाथ लोहरे, प्रेमचंद गोयल, धनराज पिवाल, सुरेश बिसनारिया आदी मान्यवर उपस्थित होते.

सभेत विवेक विचार मंच, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विश्व हिंदू परिषद, भारत विकास परिषद, समरसता मंच, वनवासी कल्याण आश्रम, भटके विमुक्त विकास परिषद, अखिल भारतीय वाल्मीकी महासभा, अण्णा भाऊ साठे विचार मंच, हिंदू जागरण मंच आदी विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)