धुळे गर्बा महोत्सव २०२५ – पाचव्या व सहाव्या दिवशी महिलांचा जल्लोष, मान्यवरांची गौरवशाली उपस्थिती

0

 

  धुळे गर्बा महोत्सव २०२५ – पाचव्या व सहाव्या दिवशी महिलांचा जल्लोष, मान्यवरांची गौरवशाली उपस्थिती 

 जनसंघर्ष न्यूज 

धुळे  दि. २८  :-  शहरात सुरू असलेल्या धुळे गर्बा महोत्सव २०२५ ला पाचव्या व सहाव्या दिवशीही महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत भव्य सोहळा अविस्मरणीय केला.


या दोन दिवसांच्या महोत्सवाला मा. जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. धरतीताई देवरे,मा.सभापती मनपा धुळे शितल भाऊ नवले,तरुणांचे आकर्षण विक्की बाबा परदेशी,युवा नेते ॲड.रोहित चांदवडे,विश्व हिंदू परिषद अध्यक्ष निलेशजी रूणवाल,सेवानिवृत्त पोलिस अधिकारी कमलाकर नाना पाटील,देवपूर मंडळ अध्यक्ष प्रथमेश भाऊ गांधी,प्रसिद्ध उद्योगपती योगीराज जी मराठे, विश्व हिंदू परिषदेचे चंदन सोमानी आदी मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.


✨ पाचवा दिवस – मोबाईल टॉर्च थीम

या दिवशी सर्व लाईट्स बंद करून हजारो महिलांनी एकाच वेळी मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात नृत्य सादर केले. मैदानावर उभा राहिलेला हा अद्वितीय देखावा थरारक आणि मनमोहक ठरला. महिलांच्या हातातील प्रकाशाने एक वेगळीच ऊर्जा आणि ऐक्याचा संदेश दिला.


✨ सहावा दिवस – समाजसुधारकांच्या वेशभूषेत गर्बा

सहाव्या दिवशी महिलांनी माँ साहेब जीजाऊ, सावित्रीबाई फुले, झाशीची राणी, अहिल्याबाई होळकर, माँ रमाई, ताराबाई यांसह थोर समाजसुधारक व महापुरुषांच्या वेशभूषा परिधान करून गर्बा सादर केला. हजारो महिलांनी एकाच वेळी साकारलेल्या या भूमिकांमुळे प्रेक्षकांसमोर नारीशक्तीचे अभूतपूर्व योगदान जिवंत झाले.


🌺 मान्यवरांचे गौरवोद्गार

मा. धरतीताई देवरे यांनी उत्कृष्ट आयोजनाबद्दल आयोजक ललित दादा माळी यांचे अभिनंदन केले.

शितल भाऊ नवले यांनी हा उत्सव मुंबई–पुण्यासारख्या महानगरांप्रमाणे भव्यतेने साजरा होत असल्याचे गौरवले.

युवा नेते ॲड. रोहित चांदवडे यांनी धर्मयोद्धा अनुप भैय्या अग्रवाल तसेच जिल्हाध्यक्ष गजेंद्र जी अंपळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ललित दादांनी धुळ्यासाठी केलेल्या भव्य आयोजनाचे कौतुक केले.

या कार्यक्रमाची संकल्पना प्रियंका ताई माने (मोटीवेशनल स्पिकर) यांची असून, त्यांच्या उत्कृष्ट संकल्पनेबद्दल मान्यवरांनी विशेष कौतुक केले.


🌟 आगामी जागतिक विक्रम प्रयत्न

देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त सुरू सेवा पंधरवड्याचा भाग म्हणून, दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोजी सेलिब्रिटी आश्विनी महांगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक विक्रम नोंदविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

या दिवशी धुळेकर महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन धुळ्याचे नाव जागतिक स्तरावर नेण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक ललित दादा माळी यांनी केले आहे.


👉 धुळे गर्बा महोत्सव २०२५ च्या या रंगीबेरंगी पर्वात महिलांच्या उत्साहाबरोबरच नारीशक्तीचा सन्मान आणि सामाजिक भानाचा संदेश दिला जात असल्याने धुळेकरांचा अभिमान वाढला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)